Headlines

लासूर स्टेशन‎:तक्रारदारावरच गुन्हा; चोरीचा बनाव करून पोलिसांना दिली खोटी माहिती




आर्थिक व्यवहारातून झालेल्या वादानंतर स्वतःच्या वाहनाच्या काचा फोडून तसेच घरातील सामानाची उचकापाचक करून चोरी व तोडफोड झाल्याचा बनाव केल्याप्रकरणी तक्रारदाराविरुद्ध शिल्लेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २७ सप्टेंबर रोजी लासूर स्टेशन परिसरातील अनंतपूर शिवारात अमोल अशोक शेळके व गणेश सोनवणे यांच्यात आर्थिक व्यवहारावरून वाद झाला होता. त्यानंतर शेळके यांनी घरातील सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरीला गेल्याचा, तसेच वाहनाची तोडफोड झाल्याचा आरोप होता. घटनेबाबत समाजमाध्यमांवरही पत्र व्हायरल झाले होते. या प्रकरणाची शिल्लेगाव पोलिसांनी चौकशी केली असता, प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार शेळके यांनी स्वतःच्या मालकीच्या (एमएच ४३ एजे ६४२२) वाहनाच्या काचा फोडल्याचे व सामानाची उचकापाचक करून चोरीचा बनाव केल्याचे उघड झाले. मित्राने वाहनाच्या काचा फोडून घरात चोरी केल्याची खोटी माहिती त्यांनी पोलिसांना दिली होती. पोलिसांना खोटी माहिती देऊन आपत्कालीन डायल ११२ यंत्रणेचा गैरवापर केल्याप्रकरणी अमोल अशोक शेळके यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *