Headlines

अजिंठा घाटामध्ये ट्रकची ट्रॉलीला धडक:मजुरांच्या ठिय्याने 10 तास वाहतूक ठप्प; 5 किलोमीटरपर्यंत रांग, 1 हजार वाहने जागीच थांबली




येथील घाटात गुरुवारी मध्यरात्री ११ वाजता जळगावकडे जाणाऱ्या ट्रकने (एमएच १८ बीझेड ३५१५) समोरून येणाऱ्या मजुरांच्या ट्रॉलीला धडक दिली. यात ट्रॉलीतील मंगल जाधव (३८, रा. जामनेर) जखमी झाला. त्यामुळे ट्रकचालकावर कारवाईची मागणी करत इतर ३५ मजुरांनी घाटात ठिय्या मांडल्याने १० तास वाहतूक ठप्प झाली. दोन्ही बाजूला ५ किमीपर्यंत १ हजार वाहने जागीच थांबली होती. रात्री ११ वाजता ठप्प झालेली वाहतूक शुक्रवारी सकाळी ९ वाजता सुरळीत झाली. जखमीला जळगाव येथे उपचारासाठी हलवण्यात आले. आठ महिन्यांत १४ वेळा घाट जाम १६ मार्च ते १६ ऑक्टोबर या आठ महिन्यांत १४ वेळा घाट जाम झाला आहे. अरुंद रस्ता, वळणांमुळे अवजड वाहतुकीची वाहने घाटात बंद पडून कोंडी होते. सध्या सणांच्या हंगामामुळे अजिंठा लेणीसाठी पर्यटकांची गर्दी होत आहे. क्षमतेपेक्षा जास्त लोड घेऊन वाहने घाटातून नेली नाही. वाहनात पुरेसे इंधन असल्याची खात्री केली. वाहन दुरुस्ती वेळीच केली तर कोंडी टाळता येऊ शकते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *