Headlines

विभक्त पत्नीचा मृत्यू; भरपाई लाटण्याचा डाव उधळला:हायकोर्टाने पतीचा डाव उधळला; बापाला केवळ 40 हजार




पतीपासून विभक्त माहेरी राहणाऱ्या आणि प्राथमिक आरोग्य केंद्रात शिपाई म्हणून राबणाऱ्या पत्नीचा अपघातात मृत्यू झाला. तिच्या निधनानंतर पतीने अनुकंपा तत्त्वावर सरकारी नोकरी मिळवली. मात्र एवढे मिळूनही त्याचे समाधान झाले नाही. त्याने तिच्या अपघाती भरपाईतील पैशांवरही हक्क सांगितला. “कष्ट एकाचे आणि फळ दुसऱ्यालाच’ अशा या संतापजनक प्रकारावर औरंगाबाद खंडपीठाने जोरदार ताशेरे ओढले. न्यायमूर्ती रोहित डब्ल्यू. जोशी यांनी पतीचा हा डाव हाणून पाडत, त्याची भरपाईची रक्कम थेट ४० हजारांवर आणली आणि वाढीव भरपाई चिमुरडीच्या व तिच्या वृद्ध आजी-आजोबांच्या पदरात टाकली. कहाणी एका लेकीची आणि तिच्या हक्काची: जालन्याच्या संजीवनी भालेराव यांचा २००९ मध्ये भगवान बनसोडे यांच्याशी विवाह झाला होता. मात्र मतभेदांमुळे त्या गरोदर असतानाच माहेरी परतल्या. १४ मे २०१० रोजी त्यांनी अंजलीला जन्म दिला. माहेरी राहूनच त्या आरोग्य केंद्रात शिपाई म्हणून रुजू झाल्या. २६ जुलै २०११ रोजी कामावर जात असताना एसटी बसच्या धडकेत संजीवनी यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्या वेळी अवघ्या १४ महिन्यांची असलेल्या अंजलीचा सांभाळ तिच्या वृद्ध आजी-आजोबांनी (अण्णासाहेब व जनाबाई भालेराव) केला. दुसरीकडे, संजीवनी यांच्या मृत्यूनंतर पतीने अनुकंपा तत्त्वावर नोकरी मिळवली. जालन्याच्या मोटार अपघात दावा न्यायाधिकरणाने १७.४१ लाख रुपयांची भरपाई मंजूर केली होती. त्यात पतीने स्वतःला ५ लाख रुपये व मुलीला १२.४१ लाख रुपये दिले, मात्र लेकीचा सांभाळ करणाऱ्या आजी-आजोबांना डावलले. याविरोधात आजी-आजोबांनी ॲड. शुभांगी मोरे पाटील यांच्यामार्फत खंडपीठात दाद मागितली. अल्पवयीन मुलीचे भविष्य सुरक्षित कमावत्या पतीला परावलंबी मानणे कायदेशीर चूक संजीवनी या २२ महिने पतीपासून विभक्त राहून माहेरी होत्या. पत्नीच्या मृत्यूनंतर पतीला अनुकंपा नोकरी मिळाली. त्यामुळे त्याचे स्वतंत्र उत्पन्न आहे. तो पत्नीवर आर्थिकदृष्ट्या अजिबात अवलंबून नव्हता. मृत संजीवनी शासकीय सेवेत असल्याने “फ्यूचर प्रॉस्पेक्ट्स’ ५० टक्के ग्राह्य धरण्यात आले. परिणामी, खंडपीठाने भरपाईची रक्कम १७.४१ लाखांवरून वाढवून थेट २२ लाख ५७ हजार ७६८ रुपये केली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *