Headlines

केंद्रातून राजीनामा आणलाय, राज्यातून आणायला वेळ लागणार नाही:मनविसेच्या वर्धापन दिनी अमित ठाकरेंची चौफेर फटकेबाजी




महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचा आज २० वा वर्धापन दिन सोहळा मुंबईत पार पडत आहे. या सोहळ्याला मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे देखील उपस्थित राहणार असून ते पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. दरम्यान, अमित ठाकरे यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना अत्यंत आक्रमक भाषण केले. यावेळी त्यांनी राज्य सरकारवर सडकून टीका केली, तसेच विद्यार्थ्यांच्या ताकदीची जाणीव करून देत संघटनेच्या पुढील वाटचालीचे चित्र स्पष्ट केले. ‘आता आंदोलने विसरून पुढे गेले पाहिजे’ विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर मनविसेने केलेल्या संघर्षाची आठवण करून देताना अमित ठाकरे म्हणाले, “आपण विद्यार्थ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी अनेक आंदोलने केली. जोपर्यंत विद्यार्थ्यांना न्याय मिळाला नाही, तोपर्यंत आपण कुठेही थांबलो नाही. पण आता आपण आंदोलने विसरली पाहिजेत आणि पुढे गेले पाहिजे. आपण आपली खरी ताकद समजून घेतली पाहिजे.” सरकार आणि चंद्रकांत पाटलांवर घणाघात सध्याच्या राजकीय आणि शैक्षणिक परिस्थितीवर भाष्य करताना अमित ठाकरे यांनी सरकारवर तीव्र संताप व्यक्त केला. “मी राजकारणी नाही, पण मला एवढे नक्की माहिती आहे की, आपल्या राज्यात सध्या भीषण परिस्थिती चालू आहे,” असे ते म्हणाले. विद्यार्थी आंदोलनात विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्ज आणि अत्याचाराचा त्यांनी तीव्र निषेध केला. यावेळी त्यांनी मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावरही टीका केली. विद्यार्थ्यांच्या ताकदीचा इशारा देताना ते म्हणाले, “या विद्यार्थ्यांनी केंद्रातून राजीनामा आणला आहे, आता राज्यातून राजीनामा आणायला त्यांना वेळ लागणार नाही.” नवी सदस्य नोंदणी मोहीम जाहीर वर्धापन दिनाचे औचित्य साधून अमित ठाकरे यांनी संघटनेच्या विस्तारासाठी मोठी घोषणा केली. आपण आजपासून पुन्हा मनविसेची सदस्य नोंदणी मोहीम जाहीर करत आहोत. या मोहिमेअंतर्गत मी स्वतः प्रत्येक ठिकाणी जाऊन सदस्यांना भेटणार आहे,” अशी ग्वाही त्यांनी दिली. संपूर्ण महाराष्ट्राला हेवा वाटेल अशी विद्यार्थी संघटना मला घडवायची आहे, अशी प्रतिक्रिया देत अमित ठाकरे यांनी मनविसेच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि विद्यार्थ्यांमध्ये नवा उत्साह निर्माण केला आहे. हेही वाचा.. केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांचा आज पुणे दौरा:काँग्रेस-भाजप आमनेसामने येण्याची शक्यता, शहराला छावणीचे स्वरूप केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज (शनिवार, 1 ऑगस्ट) पुणे दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात ते सर्वप्रथम सारसबाग येथील स्मारकाला भेट देऊन लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना त्यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करतील. त्यानंतर टिळक महाराष्ट्र विद्यापीठामध्ये आयोजित करण्यात आलेल्या विशेष कार्यक्रमात ते उपस्थित राहून त्यांच्या हस्ते लोकमान्य टिळक पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे. सविस्तर वाचा पुण्यात आर्मी का बोलावली, एवढे का घाबरताय शहा?: संजय राऊतांची अमित शहांवर टीका, 2029 पूर्वीच मोदी-शहा सत्तेतून जाणार असल्याचा दावा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज पुणे दौऱ्यावर आहेत. त्यांच्या या दौऱ्यावरून खासदार संजय राऊत यांनी अत्यंत आक्रमक शब्दांत हल्लाबोल केला आहे. संसदेचे अधिवेशन सुरू असताना त्याकडे पाठ फिरवून अमित शहा रात्रीच्या अंधारात पुण्यात आले आहेत. ‘नीट’ पेपरफुटीला गृहखातेच जबाबदार असून विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जमुळे शहांचे हात विद्यार्थ्यांच्या रक्ताने माखले आहेत, असा गंभीर आरोप संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत केला. सविस्तर वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *