Headlines

कॉंग्रेसने महिला आरक्षण विधेयकात खोडा घालण्याचे कारण नव्हते:कोणावरही वैयक्तिक टीका केली नाही, अशोक चव्हाणांचा पलटवार




महिला आरक्षण विधेयकावरून कॉंग्रेस पक्षाने माजी मुख्यमंत्री व भाजपचे खासदार अशोक चव्हाण यांच्यावर टीका केली होती. त्यावर आता चव्हाण यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. आपण कोणावरही वैयक्तिक टीका केली नाही. परंतु, कॉंग्रेसने महिला आरक्षण विधेयकामध्ये खोडा घालण्याचे कारण नव्हते, असे चव्हाण यांनी म्हटले. तसेच लोकसभेचे मतदारसंघ अवाढव्य झाले आहेत. ते आता सुटसुटीत केले पाहिजेत यात गैर काय? मतदारसंघात समानता आणली पाहिजे, असेही चव्हाण यांनी म्हटले. अशोक चव्हाण म्हणाले की, मला मान्य आहे की कॉंग्रेसच्या काळात महिलांना आरक्षण द्यायचा निर्णय झाला, ते कोणी नाकारत नाही. पण आता जे महाभाग माझ्यावर टीका करतात, त्यांनी लक्षात घेतले पाहिजे की माझी टीका वैतक्तीक नाही. महिला आरक्षणाच्या विधेयकात काल विनाकारण विरोधकांनी खोडा घातला. त्याचे काहीही कारण नव्हते. निर्णयाचे श्रेय मोदी सरकारला नको म्हणून अडवणूक पुढे बोलताना अशोक चव्हाण म्हणाले, अमित शहा यांनी प्रत्येक प्रश्नावर स्पष्टीकरण दिले आहे. विरोधकांनी सांगितलेल्या सुधारणा करायलाही ते तयार होते. सरकारची सगळी राजकीय तयारी केली, सर्व स्पष्ट केले. मतदारसंघ पुनर्रचनेततून दक्षिण भारतातील जागा कमी होत नाहीत हे स्पष्ट केले. मग त्याला दोन तृतीयांश बहुमताने पास करण्यासंदर्भात विरोधकांच्या मदतीची आवश्यकता होती. महिला आरक्षणाचा महत्त्वाचा भाग होता. पण निर्णयाचे श्रेय मोदी सरकारला नको म्हणून अडवणूक केली, असे चव्हाण यांनी म्हटले. कॉंग्रेसकडे केडर शिल्लक नाही अनेक राज्यांत कॉंग्रेसची 20-20 वर्षे झाली, तरी सरकार नाहीत. अनेक राज्यात कॉंग्रेसकडे खाली केडर शिल्लक नाही. महाराष्ट्रात तीच परिस्थिती आहे. केंद्रीय नेतृत्वाला यांच्याशी काही घेणदेणे नाही. कॉंग्रेसला काहीही भवितव्य नाही, त्यामुळे त्यांच्यातील अनेक नेते हे भाजपमध्ये यायाला तयार असल्याचे अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे. पुढे बोलताना अशोक चव्हाण म्हणाले, मी भाजपमध्ये असलो तरीही कॉंग्रेसच्या विरोधात मुद्यांवर बोलतो. सरकारने घेतलेले निर्णय योग्यच आहेत, कॉंग्रेसकडे काही मुद्दाच राहिला नाही. मी कॉंग्रेस सोडल्यामुळे काही लोकांना चांगले वाटते, कारण मी गेल्याने त्यांना संधी मिळाली. काही लोक खासगीमध्ये सांगतात की भाजपमध्ये यायचे आहे. किती दिवस विरोधात राहायचे असे बोलतात. कॉंग्रेसची अशोक चव्हाण यांच्यावर टीका कॉंग्रेसने अशोक चव्हाण यांच्यावर टीका करताना म्हटले होते की, ज्या कॉंग्रेस पक्षाशी आपले वडील स्व. शंकरराव चव्हाण साहेब आयुष्यभर एकनिष्ठ राहिलेत, त्याच कॉंग्रेस पक्षासोबत आपण गद्दारी करण्याअगोदर 2023 मध्येच “नारी शक्ती वंदन अधिनियम 2023, म्हणजे लोकसभा व विधानसभेच्या जागांमध्ये महिलांसाठीचे 33 टक्के आरक्षण हे संसदेत एकमताने (कॉंग्रेसच्या पाठिंब्याने) मंजूर झालेले आहे. ते 16 एप्रिल 2026 पासून लागूही झाले आहे. पुढे कॉंग्रेसने म्हटले की, आपल्या माहितीसाठी, ज्यांच्यामुळे आपण पहिल्यांदा लोकसभेच्या सभागृहात निवडून गेलात त्या स्व. रंजीव गांधी यांनीच स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांसाठी 33 टक्के आरक्षण लागू केले व नंतर 50 टक्के आरक्षणही कॉंग्रेसच्याच काळात लागू करण्यात आले. खाल्लेल्या मिठाला जागायला शिका, पाठीचा कणा थोडा तरी मजबूत असू द्या, अशी खोचक टीका चव्हाण यांच्यावर कॉंग्रेसने केली होती.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *