Headlines

कॉर्पोरेट जिहाद:‘इस्लाम श्रेष्ठ’ असल्याचे बिंबवत महिलांचा छळ, महिला आयोगाच्या अहवालामध्ये माहिती




नाशिकमध्ये एका बहुराष्ट्रीय कंपनीत ‘इस्लाम श्रेष्ठ’ असल्याचे बिंबवत हिंदू महिलांचा पद्धतशीरपणे छळ आणि धर्मांतरासाठी दबाव टाकल्याचा धक्कादायक प्रकार राष्ट्रीय महिला आयोगाच्या ५० पानांच्या अहवालातून समोर आला आहे. हा अहवाल नुकताच राज्याच्या मुख्यमंत्र्यांना सादर झाला असून, त्यात एचआर प्रमुखांच्या आशीर्वादाने कामाच्या ठिकाणी महिलांना कशाप्रकारे लक्ष्य केले गेले, याचे गंभीर ताशेरे ओढले आहेत. एकीकडे या अहवालातील माहितीने खळबळ उडवून दिली असतानाच, दुसरीकडे या प्रकरणात अटकेत असलेल्या ५ संशयितांच्या जामिनावर न्यायालयात तब्बल तीन तास जोरदार खडाजंगी झाली. तसेच, या प्रकरणातील मुख्य संशयित निदा खान हिची रवानगी आता थेट मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली आहे. कारागृहात असलेले संशयित रझा मेमन, आसिफ अन्सारी, शाहरुख कुरेशी, तौसीफ अत्तार आणि एचआर प्रमुख अश्विनी चैनानी यांच्या नियमित जामीन अर्जावर सोमवारी न्यायालयात सुनावणी पार पडली. यावर मंगळवारी निर्णय होईल. एचआर हेड अश्विनी चैनानी यांनी दिले संरक्षण कंपनीत दानिश, तौसीफ आणि रझा मेमन या त्रिकुटाचे वर्चस्व होते. एचआर हेड अश्विनी चैनानी यांचे संरक्षण असल्याने त्यांनी हिंदू मुलींना लक्ष्य करून त्यांचा अमानुष मानसिक व भावनिक छळ केला. धार्मिक अवमान: ‘इस्लाम हा हिंदू धर्मापेक्षा श्रेष्ठ आहे’ असे महिलांच्या मनावर बिंबवण्यासाठी त्यांच्यावर दबाव आणला गेला. हिंदू पौराणिक कथा आणि श्रद्धांचा जाणीवपूर्वक अपमान करून कामाच्या ठिकाणी अत्यंत भीतीदायक आणि असुरक्षित वातावरण निर्माण केले गेले. आयोगाच्या अहवालात २५ कठोर शिफारसी राष्ट्रीय महिला आयोगाच्या तथ्य शोध समितीने १८ आणि १९ एप्रिल रोजी नाशिकमध्ये सखोल चौकशी केली. निवृत्त न्यायमूर्ती साधना जाधव, माजी पोलिस महासंचालक बी. के. सिन्हा, सर्वोच्च न्यायालयाच्या वकील मोनिका अरोरा आणि वरिष्ठ समन्वयक लीलाबती यांच्या समितीने ८ मे रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ५० पानांचा अहवाल सादर केला. त्यात २५ हून अधिक कठोर शिफारसी केल्या आहेत. या काय शिफारसी आहेत, त्या आयोगाने स्पष्ट केल्या नाहीत. संभाजीनगरात एमआयएम नगरसेवकाचे पद धोक्यात निदा खानला आश्रय दिल्याप्रकरणी एमआयएम नगरसेवक मतीन पटेल अडचणीत आले. पटेल यांचे घर व कार्यालय अनधिकृत असल्याचा ठपका ठेवत मनपाने नोटीस बजावली असून, त्यांचे नगरसेवक पद रद्द करण्याचे संकेत महापौर समीर राजूरकरांनी दिले. पालकमंत्री संजय शिरसाट यांनी या प्रकरणाच्या एसआयटी चौकशीची मागणी केली. तर निदा खान ही इम्तियाज जलील यांची नातेवाईक असल्याचाही आरोप शिरसाट यांनी केला. यावर माजी खासदार इम्तियाज जलील यांनी नो कमेंट्स अशी प्रतिक्रिया दिली. दरम्यान नगरसेवक मतीनने मनपाच्या नोटीसविरुद्ध हायकोर्टात धाव घेतली. शारीरिक अत्याचाराचे गुन्हे नाहीत, जामीन मंजूर करा ॲड. राहुल कासलीवाल (आरोपींचे वकील)यांनी संशयित मेमन, अन्सारी, कुरेशी आणि अत्तार यांच्या यांच्यावरोधात शारीरिक अत्याचाराचे गुन्हे नाहीत. धार्मिक भावना दुखावल्याचा गुन्हा आहे. तक्रार उशिरा दाखल झाली आहे. त्यामुळे तांत्रिक मुद्यांचा विचार करून नियमित जामीन मंजूर करावा, असा युक्तिवाद केला. तसेच ॲड. देशपांडे यांनी अश्विनी चेनानी यांच्या वतीने युक्तिवाद करताना चेनानी या पुणे युनिटमध्ये कार्यरत होत्या. त्यांचा अत्याचाराच्या अथवा धार्मिक भावना दुखावण्याच्या प्रकारात थेट सहभाग नाही. एकच गुन्हा दाखल आहे. एचआर हेड म्हणून त्यांनी दुर्लक्ष केल्याचा ठपका ठेवला आहे. त्यांच्या मुलाचे लग्न आहे, त्यांना जामीन मंजूर करावा, अशी न्यायालयाला विनंती केली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *