Headlines

कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरावर दीड किलो सोन्याचा कळस:शुक्रवारी मंदिरावर बसवणार, गोव्याचे माजी CM प्रतापसिंह राणे यांच्याकडून भेट


कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरावर आता सोन्याचा कळस चढवला जाणार आहे. गोव्याचे माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे यांच्याकडून मंदिरास कळस देण्यात येणार आहे. हा कळस तब्बल अडीच कोटी रुपयांचा, दीड किलो सोन्यात मढवलेला असून अधिक महिन्यानिमित्त शुक्रवारी तो म

.

शिखर दगडाचे असले तरी कळसाखालील डेरा हा सिमेंटमध्ये बांधलेला आहे. त्यातून पाणी झिरपल्याने तेथे झाडेझुडपे उगवतात. त्यावर उपाय विचारला असता धातूचे कव्हर केले तर चालेल, असे पुरातत्त्व विभागाने देवस्थान समितीच्या वतीने प्रभारी सचिव शिवराज नाईकवाडे यांना कळवले होते. त्यावरून सोन्याच्या कळसाची कल्पना सुचली. गोव्याचे माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे यांची महालक्ष्मी देवीवर श्रद्धा असल्याने त्यांनी यापूर्वीही अंबाबाईला सोन्याचे अलंकार देणगी म्हणून दिले होते. मागील महिन्यात अंबाबाई दर्शनासाठी ते आले असता त्यांना कळसाचा विषय समजला. त्यांनी सोन्याचा कळस करण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानुसार आता कळस बवण्यात येणार आहे.

मंदिरांवरील सुवर्ण कळसाचे महत्त्व असे

हिंदू मंदिर स्थापत्यशास्त्रानुसार, शिखरावरील कळस हा विश्वातील सकारात्मक ऊर्जा आकर्षित करण्याचे केंद्र मानला जातो. कळसावर सोन्याचा मुलामा चढवल्याने मंदिराची धार्मिक भव्यता तर वाढतेच, शिवाय हवामानातील बदलांपासून शिखराच्या मूळ रचनेचे दीर्घकाळासाठी संरक्षण होते, असे तज्ज्ञ सांगतात. कोल्हापूर हे देशातील प्रमुख धार्मिक पर्यटन केंद्र म्हणून ओळखले जाते. नव्या सुवर्ण कलशामुळे मंदिराच्या वैभवात आणखी भर पडेल, असेही सांगण्यात येत आहे.

हिंदू धर्मात अधिकमासाचे आहे विशेष महत्त्व

हिंदू धर्मामध्ये अधिक महिना हा पवित्र मानला जातो. या काळात केलेले दान, पुण्यकर्म आणि मंदिरांचे जीर्णोद्धार विशेष फलदायी ठरतात, अशी भाविकांची श्रद्धा आहे. धार्मिक ग्रंथांनुसार, या विशेष पर्वकाळात देवळात सुवर्ण किंवा मौल्यवान वस्तू अर्पण केल्याने घरात सुख-समृद्धी लाभते आणि भक्तांच्या मनोकामना पूर्ण होतात, असे सांगण्यात येते. दरम्यान, अधिक महिन्यात देवीच्या दर्शनासाठी राज्यासह परराज्यातून मोठ्या प्रमाणात भाविक गर्दी करताना दिसत आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *