Headlines

कौतुकाची थाप:डोणगाव जि.प. शाळेच्या विद्यार्थिनी वंदना तांबेची महसूल सहायक, तर उज्ज्वला तांबेची आयकर निरीक्षकपदी निवड




पाचोड जिद्द, चिकाटी आणि कठोर परिश्रमांच्या बळावर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा डोणगाव येथील माजी विद्यार्थ्यांनी उज्ज्वल यश संपादन केले आहे. या शाळेचे माजी विद्यार्थी कुमारी वंदना बाबासाहेब तांबे महसूल सहायक, उज्ज्वला तातेराव तांबे हिची आयकर निरीक्षक तर दिपक पांडुरंग तांबे यांची मेडिकल रेडिओलॅाजी व इमेजींग टेक्निशियन म्हणून निवड झाली. या यशाबद्दल शाळेच्या वतीने तिन्ही विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष उपस्थित होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष व मान्यवर सदस्य व गावातील प्रतिष्ठित नागरिक, ग्रामपंचायत उपसरपंच व सदस्य व पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना यशस्वी विद्यार्थ्यांनी “जिल्हा परिषदेच्या शाळेने दिलेली शिक्षणाची भक्कम पायाभरणी आणि शिक्षकांचे मार्गदर्शन यामुळेच आम्ही स्पर्धा परीक्षेत हे यश मिळवू शकलो,” असे सांगत शालेय जीवनातील आठवणींना उजाळा दिला. याप्रसंगी शिक्षक वृंद, विद्यार्थी, गावातील ग्रामस्थ आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुग्रीव मुंडे यांनी तर आभार प्रदर्शन किरण आडकर यांनी मानले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *