Headlines

खरीप वाया, रब्बीवरही दुष्काळाचे सावटच; बार्शीत 15 टक्केच पेरणी:70 हजार हेक्टरचे उद्दिष्ट, प्रत्यक्षात केवळ 10 हजार हेक्टरवर पेरणी



पानगाव यंदा पावसाच्या लहरीपणामुळे खरीप हंगाम हातचा गेल्याने आधीच आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांसमोर आता रब्बी हंगामाचेही मोठे संकट उभे राहिले आहे. खरीप हंगाम वाया गेल्यानंतर रब्बीच्या पिकांवर आशा लावून बसलेल्या शेतकऱ्यांची निराशा होत असून, बार्शी

.

कृषी विभागाच्या पेरणी अहवालानुसार, बार्शी तालुक्यात रब्बी हंगामासाठी ७० हजार २९१.३० हेक्टर सरासरी क्षेत्र निश्चित करण्यात आले आहे. मात्र, आतापर्यंत केवळ १० हजार ७४८ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. म्हणजेच ८५ टक्क्यांहून अधिक क्षेत्र अद्याप पेरणीच्या प्रतीक्षेत आहे. पेरणीचा हा अत्यल्प टक्का तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीची तीव्रता अधोरेखित करणारा आहे. तालुक्यातील मुख्य पीक असलेल्या ज्वारीची स्थितीही चिंताजनक आहे. ज्वारीचे सरासरी क्षेत्र ५३ हजार ७८५ हेक्टर असताना आतापर्यंत केवळ ९ हजार १४७ हेक्टरवर पेरणी झाली आहे. हे प्रमाण अवघे १७.०१ टक्के आहे.

जमिनीत पुरेसा ओलावा नसणे, पाण्याची टंचाई आणि विहिरींसह बोअरवेल कोरड्या पडल्याने शेतकरी पेरणीचा धोका पत्करण्यास तयार नाहीत. गव्हाच्या पेरणीची स्थिती आणखी बिकट आहे. सरासरी ५ हजार ६३ हेक्टर क्षेत्रापैकी केवळ ३७१ हेक्टरवर म्हणजेच ७.८१ टक्के पेरणी झाली आहे. हरभऱ्याचे सरासरी क्षेत्र ११ हजार १६ हेक्टर असून, त्यापैकी १ हजार १७ हेक्टरवर म्हणजेच ९.८९ टक्के पेरणी झाली आहे. मक्याची ३०२ हेक्टर सरासरी क्षेत्रापैकी १०० हेक्टरवर म्हणजेच ३३.०७ टक्के पेरणी झाली आहे. खरीपचे नुकसान, रब्बीचीही चिंता खरीप हंगामात पावसाच्या अनियमिततेमुळे सोयाबीनसह अन्य पिकांचे मोठे नुकसान झाले.

उत्पादनात घट झाल्याने शेतकऱ्यांच्या हातात पैसा उरलेला नाही. दुसरीकडे, जमिनीतील ओलावा संपल्याने रब्बीच्या पेरणीला अपेक्षित वेग मिळत नाही. पेरणीसाठी आवश्यक बियाणे, खते आणि मशागतीचा खर्च करण्याची आर्थिक क्षमता अनेक शेतकऱ्यांमध्ये उरलेली नाही. खरीप हंगामाने आर्थिक कंबरडे मोडले, तर रब्बी हंगामाच्या सुरुवातीलाच पेरणीने पाठ फिरवली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर दुहेरी संकट उभे राहिले आहे. पाऊस पडेल का, पेरणी होईल का आणि झालेल्या पेरणीतून उत्पादन हाती येईल का, या चिंतेने बळीराजा हवालदिल झाला आहे. अशा परिस्थितीत शासनाकडून तातडीच्या मदतीची अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत आहेत.

गव्हाची पेरणी अवघी ७.८१ टक्के : रब्बी हंगामातील गहू आणि हरभरा या पिकांची पेरणीही अत्यल्प झाली आहे. गव्हाचे सरासरी क्षेत्र ५ हजार ६३ हेक्टर असताना केवळ ३७१ हेक्टरवर पेरणी झाली आहे. हरभऱ्याचे ११ हजार १६ हेक्टर सरासरी क्षेत्रापैकी १ हजार १७ हेक्टरवर पेरणी झाली आहे. अनुक्रमे ७.८१ आणि ९.८९ टक्के पेरणी झाली असून, रब्बी हंगामातील पिकांचे भवितव्य पावसावर अवलंबून आहे. कमी पावसावर काही प्रमाणात पिके उगवतील म्हणून शेतकरी मोठ्या आशेने शेत जमीन नांगरून ठेवत असल्याचे दिसत आहे. पेरणीसाठी पैसा नाही, पाणीही नाही, उत्पन्न हातचे गेले पावसाअभावी खरीप हंगाम वाया गेला. आता रब्बीच्या पेरणीसाठी जमिनीत ओलावा नाही आणि विहिरींनी तळ गाठला आहे.

खरीप हंगामातील नुकसानीमुळे हातात पैसा उरलेला नाही. पेरणीसाठी पैसा नाही आणि पाणीही नाही. अशा परिस्थितीत शेती कशी करायची, हा प्रश्न आमच्यासमोर आहे. शासनाने शेतकऱ्यांच्या परिस्थितीची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने मदत करावी. – सौदागर जमदाडे, शेतकरी ज्वारीचे क्षेत्र मोठे, पण पेरणीचा टक्का कमी बार्शी तालुक्यात रब्बी ज्वारीचे सरासरी क्षेत्र ५३ हजार ७८५ हेक्टर आहे.

मात्र, आतापर्यंत केवळ ९ हजार १४७ हेक्टरवर पेरणी झाली आहे. म्हणजेच अवघ्या १७.०१ टक्के क्षेत्रावर ज्वारीची पेरणी झाली आहे. तालुक्यातील प्रमुख रब्बी पीक असलेल्या ज्वारीची ही स्थिती दुष्काळाची तीव्रता स्पष्ट करते. जमिनीतील ओलावा आणि सिंचनासाठी पाणी नसल्याने शेतकऱ्यांनी पेरणीपासून हात आखडता घेतला आहे.

एकूण तृणधान्याचे सरासरी क्षेत्र ५९ हजार १५० हेक्टर असून, त्यापैकी ९ हजार ६४४ हेक्टरवर पेरणी झाली आहे. कडधान्याचे सरासरी क्षेत्र ११ हजार १६ हेक्टर असताना केवळ १ हजार ७० हेक्टरवर पेरणी झाली आहे. एकूण अन्नधान्याची पेरणी १० हजार ७४२ हेक्टरवर झाली आहे. गळीतधान्याची स्थितीही फारशी वेगळी नाही. सूर्यफूल, करडई, तीळ आणि जवस यांसारख्या पिकांची पेरणी नगण्य झाली आहे. गळीतधान्याचे सरासरी क्षेत्र ३९.५० हेक्टर असताना केवळ ६.४० हेक्टरवर म्हणजेच १६.२० टक्के पेरणी झाली आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *