Headlines

खर्डी गावात सोनाई-सीताई देवी यात्रेला प्रारंभ:रविवारी मुखवट्याची मिरवणूक, अक्षय्य तृतीयेपर्यंत रंगणार सोहळा; शेंदरी रंगातील भव्य मूर्ती आकर्षणाचे केंद्र‎



ठाणे जिल्ह्यातील मुंबई-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील खर्डी गाव सध्या भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाले आहे. निसर्गरम्य परिसरात वसलेल्या श्री सोनाई-सीताई देवीच्या वार्षिक यात्रोत्सवाला उत्साहा त सुरुवात झाली असून, १८५ वर्षांची ऐतिहासिक परंपरा लाभलेला हा

.

अंदाजे १८५ वर्षांपूर्वी देवीचे मूळ स्थान शिरोळ येथील गोपाळपाड्यावर होते. स्थानिक रहिवासी भिका झनकर यांना देवीने स्वप्नात दृष्टांत दिल्यानंतर, ग्रामस्थांनी अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर देवीची खर्डीत स्थापना केली. आजही शिरोळ येथे मूळ शिळेवर वाघावर आरूढ असलेली देवीची प्रतिमा पाहायला मिळते.

खर्डी येथील मंदिराच्या गाभाऱ्यात देवीचे दोन अद्वितीय मुखवटे असून, त्यातील एक बालसुलभ निरागसता तर दुसरा शांत आणि मातृत्वाचे भाव दर्शवतो. शेंदरी रंगातील भव्य मूर्ती आणि चांदीचा मुकूट हे भक्तांच्या आकर्षणाचे केंद्र आहे.

यात्रेचा सर्वोच्च बिंदू अक्षय्य तृतीयेच्या दिवशी (दि.१९) गाठला जातो. या दिवशी देवीचे पात्र धारण केलेल्या व्यक्तीच्या मस्तकावर श्री सोनाई-सीताई देवीचा मुखवटा ठेवून भव्य मिरवणूक काढली जाते. खर्डी रेल्वे स्थानकापासून अवघ्या २ किमी अंतरावर असलेल्या या मंदिरात ठाणे, नाशिक आणि मुंबई परिसरातील हजारो भाविक देवीच्या दर्शनासाठी गर्दी करत मंदिरात करत असून, परिसरात धार्मिक वातावरण निर्माण झाले आहे.

पारंपरिक ‘बोहाडा’ उत्सव या यात्रोत्सवाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे, पाच दिवस चालणारा ‘बोहाडा’ (लळित) उत्सव. यामध्ये पौराणिक परंपरांचे दर्शन घडते. उत्सवाच्या पहिल्या दिवशी गावातील पाटलांच्या घरासमोर मांडव उभारून देशमुख मराठा, शिंदे, बेदरकर, फाकटकर, निगुजकर (सोनार) आणि मुळे (ब्राह्मण) यांसारख्या मानकरी घराण्यांचा सन्मान केला जातो. पारंपरिक वाद्यांच्या गजरात निघणाऱ्या मिरवणुकीत गणपती, सरस्वती, काळभैरव आणि खंडेराव अशा विविध देवतांची सोंगे साकारली जातात. यात सादर होणारे नरसिंह अवतार आणि रामायणकालीन प्रसंग भाविकांच्या डोळ्यांचे पारणे फेडतात.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *