Headlines

गणेशोत्सवाची तयारी:सात्रळच्या बाप्पांची परगावी ‘क्रेझ’; 70 % मूर्ती विकल्या




सुनील सात्रळकर | सात्रळ गणेशोत्सव जवळ आल्याने येथील मूर्ती कारागिरांची गणेशमूर्तींवर रंगरंगोटी, सजावट आणि अंतिम हात फिरविण्याची लगबग सुरू झाली आहे. तयार केलेल्या मूर्तींपैकी सुमारे ७० टक्के मूर्तींची विक्री झाली असून उर्वरित मूर्तींना अंतिम स्वरूप देण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. देखण्या मूर्ती, आकर्षक रंगसंगती आणि सुंदर सजावटीसाठी सात्रळ येथील उपाध्ये बंधूंचा मूर्ती कारखाना परिसरात प्रसिद्ध आहे. बाळासाहेब उपाध्ये, विजय उपाध्ये आणि त्यांचे कुटुंब गेल्या ४० ते ५० वर्षांपासून गणेशमूर्ती तयार करण्याचा व्यवसाय करीत आहेत. या व्यवसायात संपूर्ण कुटुंबाचा सहभाग असून लहान मुले-मुलीही विविध कामांमध्ये मदत करताना दिसून येतात. यंदा मूर्ती तयार करण्यासाठी लागणारा कच्चा माल, रंग तसेच सजावटीचे साहित्य महागल्याने गणेशमूर्तींच्या किमतीत वाढ झाली आहे. सध्या एक फुटी मूर्ती ३०० रुपयांपेक्षा अधिक, दोन फुटी मूर्ती १ हजार ते १ हजार २०० रुपये, तर तीन ते चार फूट उंचीच्या मूर्ती सुमारे ४ हजार रुपयांपर्यंत विकल्या जात आहेत. मूर्तींच्या सजावटीसाठी लागणारे रंग व इतर साहित्य पेण (जि. रायगड) येथून खरेदी केले जाते. विशेष म्हणजे, गणेशमूर्ती तयार करण्याचे काम वर्षभर सुरू असते. संपूर्ण कुटुंबाच्या सहभागातून मूर्ती घडवण्यापासून ते रंगरंगोटी व सजावटीपर्यंतची विविध कामे केली जातात. सात्रळ येथील या कारखान्यात तयार होणाऱ्या गणेशमूर्तींना नाशिक, अहिल्यानगर, पुणे, शिर्डी, राहाता, निफाड यांसह विविध भागांतील व्यापाऱ्यांकडून मागणी आहे. गणेशोत्सवाच्या सुमारे महिनाभर आधीच व्यापारी मूर्ती खरेदी करून विक्रीसाठी घेऊन जात असल्याने कारखान्यात सध्या अंतिम कामांची मोठी लगबग सुरू आहे. कारखान्यात गणेशमूर्तीवर शेवटचा हात फिरवताना सात्रळ येथील उपाध्ये दाम्पत्य. रंगसंगती आणि सजावटीत केले जातात नवीन प्रयोग उपाध्ये कुटुंबीयांनी चार-पाच दशकांपासून गणेशमूर्ती घडविण्याची परंपरा जपली आहे. बदलत्या काळानुसार मूर्तींचे आकार, रंगसंगती आणि सजावटीत नवनवीन प्रयोग केले जात आहेत. पूर्वीच्या पारंपरिक मूर्तींपासून आधुनिक आकर्षक रूपातील मूर्तींपर्यंत ग्राहकांच्या पसंतीनुसार विविध प्रकार तयार केले जातात. मातीला आकार देण्यापासून ते मूर्तीवर रंगांचा शेवटचा हात फिरविण्यापर्यंत कुटुंबातील प्रत्येक सदस्याचा सहभाग असतो. उपाध्ये परिवाराची ४०-५० वर्षांची परंपरा उपाध्ये कुटुंबाने चार-पाच दशकांपासून गणेशमूर्ती कलेची परंपरा जपली आहे. बदलत्या काळानुसार मूर्तींची रंगसंगती, सजावट आणि आकर्षक रूप यामध्ये नवनवीन प्रयोग केले जात असून त्याला ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *