![]()
पुणे महापालिकेने गणेश विसर्जनासाठी शहरात २६ ठिकाणी वाहनतळांची व्यवस्था केली आहे. विसर्जन मिरवणुकीमुळे प्रमुख मार्गांवर वाहतूक वाढणार असल्याने नागरिकांची गर्दी लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. नागरिकांनी उपलब्ध करून दिलेल्या वाहनतळांचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. २५ सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजल्यापासून नागरिक मोठ्या संख्येने गणेश विसर्जनासाठी बाहेर पडण्याची शक्यता आहे. दुचाकी आणि चारचाकी वाहनांसाठी स्वतंत्र पार्किंगची सोय उपलब्ध करून दिली आहे. यामध्ये न्यू इंग्लिश स्कूल, रमणबाग; शिवाजी आखाडा वाहनतळ; देसाई कॉलेज; हमालवाडा (पत्र्यामारुती चौकाजवळ); गोगटे प्रशाला; एस एस पी एम मैदान (आरटीओ चौक); एस. पी. कॉलेज; पीएमपीएमएल मैदान (पुरम चौकाजवळ); पेशवे पार्क (सारसबाग); हरजीवन हॉस्पिटल समोर (सावरकर चौक); पाटील प्लाझा पार्किंग; पर्वती ते दांडेकर पूल; दांडेकर पूल ते गणेशमळा या ठिकाणांचा समावेश आहे. याशिवाय, गणेशमळा ते राजाराम पूल, निलायम टॉकीज, बीएमसीसी कॉलेज मैदान, आबासाहेब गरवारे कॉलेज, संजीवनी मेडिकल कॉलेज मैदान, फर्ग्युसन कॉलेज, जैन हॉस्टेल बीएमसीसी रोड मैदान, मराठवाडा कॉलेज, पेशवे पथ, रानडे पथ, काँग्रेस हाऊस रोड, न्यू इंग्लिश स्कूल टिळक रोड आणि नदीपात्रातील भिडे पूल ते गाडगीळ पूल या ठिकाणीही वाहनतळाची व्यवस्था करण्यात आली आहे. गणेश विसर्जनाच्या दिवशी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी नागरिकांनी शक्य असल्यास सार्वजनिक वाहतूक वापरावी. तसेच, वाहने वाहनतळाच्या ठिकाणीच उभी करून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस उप आयुक्त डॉ. संदीप भाजीभाकरे यांनी केले आहे.
Source link
गणेश विसर्जनासाठी पुणे शहरात 26 ठिकाणी वाहनतळांची व्यवस्था:मिरवणुकीमुळे प्रमुख मार्गांवर वाहतूक वाढणार असल्याने निर्णय