Headlines

"गणपती बाप्पा मोरया, प्रशासनाला सदबुद्धी द्या":आनंदोत्सवासोबत आंदोलनही, इलेक्ट्रीक शहर बस सुरू करण्याची मागणी




टाळ, तालवाद्यांसह बाप्पांच्या आरतीचा उत्साह, सोबतच 61 शहर बस मिळाल्याचा आनंद.. एक वर्षांनंतर आलेल्या बाप्पांमुळे हर्ष, सोबतच शहर बससाठी एक वर्षांच्या लढ्याला आलेले यश.. त्यामुळे मंगळवारचा दिवस आनंदोत्सवाचा. पण सोबतच आंदोलनाचा सुद्धा. प्रशासनाला जाब विचारण्याचा, मुख्यमंत्र्यांना आवाहन करण्याचा. बाप्पांच्या जयघोषासह देण्यात आलेल्या वेगळ्या घोषणांमुळे लक्षवेधी ठरलेला. शहरातील ‘कला कट्टा’ येथील संध्याकाळ. गणेशभक्त, पर्यावरण प्रेमी, जागरूक नागरिक आणि सामाजिक संस्थाचे सदस्य यांनी ऊर्जावान केलेली. सुरूवातीला विविध आरतीचा आनंद घेत असलेल्या उपस्थितांनी, ‘सनईचा सूर कसा वा-यानं भरला’ या आरतीवर ठेका धरला. ज्येष्ठ नागरिक, उद्योजक, शिक्षक, व्यवसायिकांनी भक्तीभावे ‘गणेशाच्या भजनात नाचण्यात दंग’ या ओळींचा अनुभव घेतला. आरतीनंतर मात्र अनोख्या आंदोलनाची सुरूवात झाली. सुरबवातीला ‘आम्ही पर्यावरण प्रेमी’चे समन्वयक रूपेश कलंत्री यांनी डबल द बस या अभियानाची माहिती दिली. निवेदन, चर्चा, आंदोलन, माहिती अधिकार, सोशल मीडियावरील एक वर्षांच्या लढ्याविषयी सांगितले. या अभियानात सहभागी व्यक्ती, संस्थाचे आभार मानले. अखेर एसी इलेक्ट्रिक बस मिळल्याबद्दल, मनपा आयुक्त आणि महापौरांचे अभिनंदन केले. मात्र मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटनाच्या हट्टापाई या बस पडून असल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. यावेळी ज्येष्ठ पत्रकार धनंजय लांबे, आर.बी.गिरी यांनी, जागरूक नागरिकांनी प्रत्येक चुकीच्या गोष्टींचा विरोध केला पाहिजे असे मत व्यक्त केले. बाप्पांना साकडे, आगळ्या वेगळ्या घोषणा
गणपती बाप्पा मोरया, इलेक्ट्रिक बस सुरू करा…
गणपती बाप्पा मोरया, प्रशासनाला सदबुद्धी द्या..
गणपती बाप्पा मोरया, सीएम साहेब लक्ष द्या..
मोरया रे बाप्पा मोरया रे, मोरया रे बाप्पा मोरया रे..



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *