Headlines

चंद्रपुरात राजकीय राडा:एमआयएम नगरसेवक अझहर शेख यांच्यावर प्राणघातक हल्ला, काँग्रेसच्या नेत्यावर गंभीर आरोप




चंद्रपूर महानगरपालिकेतील ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन पक्षाचे एकमेव नगरसेवक अझहर शेख यांच्यावर 10 ते 15 जणांच्या टोळक्याने प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या हल्ल्यात शेख गंभीर जखमी झाले असून, चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या हल्ल्यामागे काँग्रेस कार्यकर्त्यांचा आणि नेत्यांचा हात असल्याचा खळबळजनक आरोप त्यांनी केला आहे. मी महानगरपालिका निवडणुकीत ‎‎जिंकल्यामुळे विरोधक माझा विजय पचवू ‎‎शकलेले नाहीत. माझ्या जीवाला काही ‎‎बरेवाईट झाल्यास त्याला माझे राजकीय ‎‎विरोधकच जबाबदार असतील, असा ‎‎आरोप करत एमआयएमचे नगरसेवक ‎‎अजहर शेख यांनी चंद्रपूरच्या ‎राजकारणात खळबळ उडवून दिली आहे. ‎25 जुलैच्या रात्री 10 ते 15 जणांच्या ‎‎टोळक्याने आपल्यावर प्राणघातक हल्ला ‎‎केल्याचा दावा करत, या हल्ल्यामागे थेट‎ काँग्रेस नेते सोहेल शेख यांचा हात‎ असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला ‎आहे.‎ मिळालेल्या माहितीनुसार, 25 जुलै रोजी ‎रात्री अजहर शेख हे जटपुरा गेट येथील‎ एका बिर्याणी हॉटेलमध्ये बसले होते.‎ त्यावेळी काही लोकांनी हॉटेलमध्ये प्रवेश‎ करत त्यांच्याशी राजकीय वादातून हुज्जत‎ घालण्यास सुरुवात केली. हा वाद हळूहळू‎ विकोपाला गेला आणि हॉटेलबाहेर‎ नगरसेवक अजहर शेख यांना मारहाण‎ करण्यात आली. हल्ल्यात दुखापत‎ झाल्याने सध्या त्यांच्यावर शासकीय‎ रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अजहर शेख हे चंद्रपूर‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ महानगरपालिकेत एमआयएमचे एकमेव‎ नगरसेवक असल्याने राजकीय‎ वैमनस्यातूनच हा हल्ला घडवून‎ आणल्याचा दावा त्यांनी केला आहे. ‎दुसरीकडे, या मारहाणीमागे जुना वैयक्तिक‎वाद असल्याचे काही सूत्रांचे म्हणणे‎ असले, तरी पीडित नगरसेवकाच्या गंभीर ‎आरोपांमुळे या घटनेला राजकीय वळण‎ मिळाले आहे.‎ दरम्यान, या प्रकरणात थेट आरोप ‎झालेल्या काँग्रेस नेत्या सोहेल शेख ‎यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला‎ असता, त्यांच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया ‎मिळू शकली नाही. या राजकीय वादावर‎आता पोलीस कोणती कारवाई करतात,‎याकडे संपूर्ण चंद्रपूरचे लक्ष लागले आहे.‎



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *