Headlines

‘गजर माऊली’चा कार्यक्रमाने वातावरण भक्तिमय:विठ्ठलभक्तीचा जागर; सांस्कृतिक कार्य संचालनालयाचा पुढाकार‎




आषाढी एकादशीनिमित्त आयोजित ‘गजर माऊली’ या विशेष भक्तिसंगीत कार्यक्रमाने वातावरण भक्तिमय करून टाकले. सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे प्रमिलाताई ओक नाट्यगृहात झालेल्या कार्यक्रमाला रसिक-भक्तांची मोठी उपस्थिती लाभली. दीपप्रज्वलन हभप संतोष महाराज पिसे आणि ज्येष्ठ भाषाशास्त्रज्ञ प्रा. रावसाहेब काळे यांच्या हस्ते करण्यात आले. कल्याणी पवित्रकार यांच्या सुमधुर आवाजातून भक्तिगीते, अभंग, विठ्ठलभक्तीपर रचनांचे सादरीकरण झाले. त्यावेळी वातावरण अधिकच भक्तिमय झाले. वारकरी संप्रदायाची अखंड संतांच्या अभंगांचे आध्यात्मिक चिंतन, विठ्ठलनामाच्या अखंड गजरातून भक्तिभाव जागवणारा हा कार्यक्रम रसिकांसाठी एक आगळावेगळा सांस्कृतिक अनुभव ठरला. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव, संत एकनाथ आदी संतांच्या विचारांचा आणि विठ्ठलभक्तीच्या समृद्ध वारशाचा सुरेल आविष्कार या कार्यक्रमातून सादर करण्यात आला. हा सांस्कृतिक उपक्रम सांस्कृतिक कार्य, माहिती तंत्रज्ञान, इलेक्ट्रॉनिक्स व कृत्रिम बुद्धिमत्ता मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या संकल्पनेतून तसेच सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला. राज्याच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचे जतन, संवर्धन, प्रसार करण्यासाठी सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत अशा दर्जेदार सांस्कृतिक कार्यक्रमांचे सातत्याने आयोजन करण्यात येत आहे. कीर्तनातून उलगडला विठ्ठलाचा महिमा कार्यक्रमात प्रसिद्ध कीर्तनकार प्रवचनकार संतोष महाराज पिसे यांच्या अमृत वाणीतून विठ्ठलमहिमा उलगडला. गायनाचार्य हरिश्चंद्र पिसे, भानुदास धोटे, किशोर कावर गीता पिसे, रश्मी पवार, विजय राऊत तबला, गावंडे महाराज शेगाव मृदंग, राजीव जोशी बासरी, लोकेश अवचार, कीबोर्ड, टाळ वादन, भक्तराज गावंडे, सुभाष बेले, राजेश वरुडकर, श्रीकृष्ण झटाले यांनी सहभाग घेतला. संचालन डॉ.गणेश बोरकर यांनी केले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *