![]()
ऑटोमोबाईल उत्पादन आता आगामी काळात इलेक्ट्रॉनिक आधारित होणार असून सॉफ्टवेअर महत्वाचे आहे. नवी मुंबई विमानतळ, पुरंदर विमानतळ, वाढवण बंदर यामुळे महाराष्ट्राचा चेहरामोहरा बदलणार असून मर्सिडिज बेंझ यांनी मागील तीन दशकांचा अनुभव लक्षात घेऊन आपल्या कामाचा देखील आगामी काळात विस्तार करावा. जागतिक दर्जाची गुणवत्तापूर्ण वाहने विकसित करण्यात यावी असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. चाकण येथील मर्सिडीज बेंझच्या कंपनी मध्ये नवीन इलेक्ट्रिक जीआयसी वाहनाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, मर्सिडीज बेंझचे सुपर वायझरी बोर्डचे चेअरमन मार्टिन ब्रिडरमुयूलर, बोर्ड ऑफ मॅनेजमेंटचे चेअरमन ओला कॅलेनियस, चीफ टेक्नॉलॉजी ऑफिसर डॉ. जॉर्ज बर्झर उपस्थित होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, महाराष्ट्र हे वाहन उत्पादनाचे प्रमुख क्षेत्र देशातील आहे. मर्सिडिज बेंझ यांनी अत्याधुनिक तंत्रद्यान वापरून नवीन इलेक्ट्रिक वाहन निर्मिती केली आहे. एका चर्जिग मध्ये ही वाहन ७११ किलोमीटर जाऊ शकणार आहे. जागतिक तंत्रज्ञानावर आधारित वाहन निर्मिती याठिकाणी होत आहे याचा आम्हाला अभिमान आहे. जगाचे ऑटोमोबाईल उत्पादन याठिकाणी केंद्रित झाले असून मर्सिडिज बेंझ यांनी याठिकाणावरून एक लाख ७० हजार वाहनाची विक्री केली आहे. कंपनी विस्तारत असून आता तीन हजार २०० कोटीची गुंतवणूक मर्सिडीज यांनी देशात केली आहे. याद्वारे चाकण परिसरात ८० हजार जणांना रोजगार निर्माण झाला आहे. तसेच तंत्रज्ञान आता प्रत्यक्षात आले असून नागरिकांना जागतिक दर्जाची आरामदायी वाहने याठिकाणी मिळू शकणार आहे. मेक इन इंडिया अंतर्गत चाकण परिसरात वाहन उद्योगाचे विस्तारीकरण होत आहे. मर्सिडिज बेंझ हे वर्षाला ४२ हजार इलेक्ट्रिक वाहने याठिकाणी उत्पादन करणार आहे. त्यांना आता महाराष्ट्र चांगल्याप्रकारे माहिती असून त्यांनी आता केवळ इंडियासाठी उत्पादन करू नये तर जगासाठी वाहन निर्मिती याठिकाणावरून करावी. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार म्हणाल्या, मागील तीन दशकांपासून वाहन उद्योगात मर्सिडीजचे मोठे योगदान आहे. इलेक्ट्रिक वाहन निर्मिती होण्यासाठी अजितदादा नेहमी आग्रही होते. त्यादृष्टीने त्यांनी इलेक्ट्रिक वाहन निर्मितीसाठी सातत्याने प्रयत्न केले. पर्यावरणपूरक इलेक्ट्रिक वाहने आगामी काळात महत्वाची आहे. सध्या दुष्काळी परिस्थिती असून पाण्याचा काटकसरीने वापर करण्यात यावा. मर्सिडीज बेंझचे सुपर वायझरी बोर्डचे चेअरमन मार्टिन ब्रिडरमुयूलर म्हणाले, मर्सिडिज माध्यमातून जर्मनी आणि भारत यांचे ७५ वर्षाचे अतूट नाते निर्माण झाले आहे. भारत हा महत्वपूर्ण देश असून नवीन तंत्रज्ञान वापर विविध क्षेत्रात करण्यात येत आहे. त्याप्रमाणे तंत्रद्यानबाबत दोन्ही देश देखील पुढाकर घेत आहे. आगामी काळात देखील हे संबंध अधिक दृढ होतील.
Source link
चाकणमध्ये मर्सिडीजच्या नव्या इलेक्ट्रिक वाहनाचे अनावरण:फडणवीस म्हणाले- कंपनीने जागतिक बाजारासाठीही वाहने बनवावीत