Headlines

चारित्र्याच्या संशयातून पतीकडून पत्नीचा खून:दोन्ही आरोपी पोलिसांच्या ताब्यात, पत्नीवर सतत संशय घेत असल्याने उचलले टोकाचे पाऊल‎




पैठण चारित्र्याच्या संशयातून पतीने आपल्या पत्नीचा डोक्यात कुऱ्हाडीने वार करून निर्घृण खून केल्याची घटना संत ज्ञानेश्वर उद्यान परिसरात बुधवारी सकाळी ७.३० वाजेच्या सुमारास घडली. मंदाबाई सुरेश अंगारखे (४५, रा. गांगलवाडी, नारळा) असे मृत महिलेचे, तर सुरेश अंगारखे असे आरोपी पतीचे नाव आहे. दरम्यान, पत्नीचा खून केल्यानंतर आरोपी स्वतःहून पोलिस ठाण्यात हजर झाला. आरोपी सुरेश अंगारखे याचे दोन विवाह झाले होते. मृत मंदाबाई ही त्याची दुसरी पत्नी होती. सुरेश काही काळापासून मंदाबाईच्या चारित्र्यावर सतत संशय घेत होता. बुधवारी दोघे उद्यान परिसरात लाकडे तोडण्यास गेले. लाकडे तोडत असतानाच वाद उफाळून आला. सुरेशने कुऱ्हाडीने मंदाबाई यांच्या डोक्यावर तीन जीवघेणे वार केल्याने त्यांचा मृत्यू झाला. मृत कांताबाई आरोपी दगडू मधे आठ दिवसांपासून दोघेही सरपणासाठी जात होते गेल्या आठ दिवसांपासून आरोपी आणि मृत पत्नी उद्यान परिसरात सरपण तोडण्यासाठी जात होते. मात्र, ज्या कुऱ्हाडीने सरपण तोडले जात होते त्याच कुऱ्हाडीचा वापर करून आरोपीने पत्नीचा जीव घेतल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. प्रतिनिधी | कन्नड पतीने चारित्र्याच्या संशयावरून आपल्या पत्नीचा नायलॉन दोरीने गळा आवळून खून केल्याची घटना बुधवारी चिवळी येथील दुर्गम डोंगरघाटात सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास घडली. कांताबाई दगडू मधे (३३) असे मृत महिलेचे तर आरोपी दगडू अशोक मधे (३८) आरोपी पतीने नाव आहे. आरोपी दगडू याला पत्नी कांताबाईच्या चारित्र्यावर संशय होता. बुधवारी सकाळी त्याने पत्नीला “चल, आपण सासरवाडीला गुजरदरी येथे जाऊन येऊ,’ असे सांगितले. ४ किलोमीटर अंतरावर असलेल्या चिवळी घाटात रस्त्यावर आजूबाजूला कोणीही नसताना दगडूने गाडी थांबवून कांताबाईचा गळा आवळत खून केला. आईला वाचविण्यास मुले १ किलोमीटर पळाली आर्थिक विवंचनेतून तणाव? आरोपी सुरेश याने काही वर्षे मुंबई महापालिकेत नोकरी केली होती. पहिल्या पत्नीपासून चार, तर दुसऱ्या पत्नीपासून दोन मुले असून सध्या दोन्ही पत्नी आणि मुलांसह तो राहत होता. नोकरी सोडल्यानंतर तो आर्थिक विवंचनेत असल्याचे शेजाऱ्यांनी सांगितले. सोबत असलेली मुले आईचा जीव जाताना पाहून जिवाच्या आकांताने एक किलोमीटर मागे पळत सुटली. त्यांनी पांडू कडाळे यांना सांगितल्याने ते नागरिकांसह घटनास्थळी गेले असता कांताबाई मृत झाल्या होत्या. सपोनि नारायण गिते, हवालदार अजय मोतिंगे तपास करीत आहेत. मृत मंदाबाई अंगारखे पंचायतीने मिटवला वाद कळंकी येथील आदिवासी नेते रावजी पथवे यांनी सांगितले की, वर्षापूर्वी या पती-पत्नीमध्ये मोठे भांडण झाले होते. सासरच्या त्रासामुळे कांताबाई माहेरी गुजरदरी येथे निघून गेल्या होत्या. मात्र, आदिवासी पंचायतीने बैठक घेऊन त्यांच्यातील वाद मिटवला होता.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *