Headlines

अनमोल अहिरे खून प्रकरण:खून प्रकरणातील आरोपी नगरसेवकाच्या अटकेसाठी पैठण पोलिस ठाण्यात ठिय्या




इंदिरानगर येथील अल्पवयीन मुलगा अनमोल देविदास अहिरे (१७) याच्या खून प्रकरणातील आरोपी नगरसेवक ईश्वर दगडे याच्या अटकेसाठी नातेवाइकांनी बुधवारी पैठण ठाण्यात ठिय्या आंदोलन केले. तीन तास चाललेल्या आंदोलनानंतर पोलिस निरीक्षक महादेव गोमारे यांनी कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. मात्र त्यानंतरही नातेवाइकांनी घाटी रुग्णालयात जाऊन मृतदेह २४ तासानंतरदेखील ताब्यात घेण्यास नकार दिला. इंदिरानगर परिसरात मंगळवारी सकाळी काही दिवसांपूर्वी झालेल्या वादातून धारदार शस्त्राने वार करून अनमोल अहिरे याचा खून करण्यात आला. अनमोलचे वडील देविदास अहिरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एका अल्पवयीन मुलासह त्याचे वडील आणि नगरसेवक ईश्वर दगडे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल आहे. घटनेनंतर शवविच्छेदनासाठी मृतदेह ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आला. मात्र मुख्य आरोपी अद्याप मोकाट असल्याचा आरोप करत नातेवाइकांनी पोलिस ठाण्यात धाव घेतली. आरोपींना तत्काळ अटक करण्याच्या मागणीसाठी त्यांनी ठिय्या आंदोलन सुरू केले. मृतदेह २४ तासांनंतरही घाटी रुग्णालयातून ताब्यात घेण्यास नकार दिला. सीसीटीव्हीत घटना कैद या खुनाचा संपूर्ण प्रकार परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांत कैद झाला असून, तपासासाठी पोलिसांनी फुटेज ताब्यात घेतले आहे. आरोपींकडून धारदार शस्त्राने हल्ला केल्याचे दृश्य सीसीटीव्हीत कैद झाले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *