Headlines

वेरूळला 51 जोडप्यांच्या हस्ते होणार अभिषेक:सोहळ्यासाठी कोल्हापूरहून आणल्या सिंहासनारूढ शिवरायांच्या 51 मूर्ती‎




वेरूळ स्वराज्याची संकल्पभूमी व पितृतीर्थ श्रीक्षेत्र वेरूळ येथील मालोजीराजे भोसले गढीवर ३५२ वा शिवराज्याभिषेक सोहळा शनिवार (६ जून) रोजी उत्साहात साजरा होणार असल्याची माहिती स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र पवार यांनी दिली. शहाजीराजे भोसले स्मारकासमोर सकाळी ८ वाजता या सोहळ्याचे आयोजन केले असून या वेळी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासह महाराष्ट्रातील ५१ मान्यवर जोडपी सपत्नीक उपस्थित राहून छत्रपती शिवरायांच्या ५१ मूर्तींवर सामूहिक अभिषेक करणार आहेत. राजेंद्र पवार म्हणाले, “स्वराज्याचा संकल्प ज्या पवित्र भूमीत झाला त्या वेरूळमध्ये हा सोहळा व्हावा या भावनेने मागील २ वर्षांपासून मालोजीराजे भोसले गढीवर शिवराज्याभिषेक दिन साजरा करतो. हे तिसरे वर्ष आहे. बाबाजीराजे, मालोजीराजे, विठोजीराजे, शहाजीराजे, शरीफजीराजे, व्यंकोजीराजे व छत्रपती शिवरायांचे थोरले बंधू संभाजीराजे यांचा जन्म या भूमीत झाला. शहाजीराजे आणि माँ जिजाऊ यांचेही विवाहानंतर येथेच वास्तव्य होते. या सोहळ्यासाठी कोल्हापूरहून सिंहासनारूढ शिवरायांच्या ५१ मूर्ती आणण्यात आल्या आहेत. सकाळी ८:३० ते ९:३० या वेळेत सप्तनद्यांचे पाणी, समुद्र जल, पंचामृत, सुवर्ण जल, रजत जल, औषधी जल, आमरस अशा १६ प्रकारच्या जलांनी ५१ जोडप्यांच्या हस्ते अभिषेक होईल. अभिषेकानंतर या मूर्ती मान्यवरांना भेट देण्यात येणार आहेत. या वेळी पालकमंत्री संजय शिरसाट, मंत्री अतुल सावे, खा. संदिपान भुमरे, माजी मंत्री भागवत कराड, आ. प्रशांत बंब, आ. रमेश बोरनारे, आ. संजना जाधव, आ. अंबादास दानवे, आ. अनुराधा चव्हाण, आ. सतीश चव्हाण, जि.प. अध्यक्ष अविनाश गलांडे, महापौर समीर राजूरकर, उपमहापौर राजेंद्र जंजाळ, अधिकारी उपस्थित राहतील. ज्यांना रायगडावर जाणे शक्य नाही त्यांनी ६ जून रोजी सकाळी ८ वाजता मालोजीराजे भोसले गढी, श्रीक्षेत्र वेरूळ येथे मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन अध्यक्ष राजेंद्र पवार यांनी केले आहे. फेटे, फुलांची सजावट, तुतारीचा निनाद : सोहळ्यासाठी सर्व मान्यवरांना भगवे फेटे देण्यात येतील. शहाजीराजे व शिवरायांचे स्मारक फुलांनी सजवले जाईल. भालदार, चोपदार, तुतारी व आकर्षक बैठक व्यवस्था हे सोहळ्याचे वैशिष्ट्य असणार आहे. अभिषेकानंतर महाप्रसादाचे वाटप होईल.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *