![]()
मंगळवेढा ही संतांची भूमी असून संत चोखामेळा म्हणजे निष्काम भक्तीचे प्रतीक आहेत. ज्यांचे अवघे कुटुंब संत झाले, असे हे घर मंगळवेढ्याला भक्तीची थोर परंपरा देऊन जाते, असे प्रतिपादन खासदार डॉ. ज्योती वाघमारे यांनी गुरुवारी येथे केले. निमित्त होते संत शिरोम
.
गुरुवारी सकाळी ८ वाजता संत शिरोमणी चोखोबा महाराज यांच्या समाधीची महापूजा खासदार डॉ. ज्योती वाघमारे व नगराध्यक्षा सुनंदाताई आवताडे यांच्या हस्ते मंगलमय वातावरणात करण्यात आली. यावेळी कवी इंद्रजीत घुले, निवृत्ती महाराज रामदास, मंदिर समितीचे अध्यक्ष जयराज शेंबडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. आपल्या भाषणात खासदार वाघमारे यांनी चोखोबांच्या ‘ऊस डोंगा परी रस नोहे डोंगा’ या अभंगाचा दाखला दिला. आज आपण वर्णाचा आणि बाह्य रूपाचा विचार करतो, मात्र वारकरी संप्रदायाने गुण आणि भक्तीला श्रेष्ठ मानले आहे. विठ्ठलाच्या पायाशी गेल्यावर अवघा रंग एक झाला अशी आपली भक्तीची परंपरा आहे, असे त्यांनी नमूद केले.
मंगळवेढ्यात संत चोखामेळा यांचे भव्य स्मारक व्हावे, अशी अनेक वर्षांची मागणी आहे. यावर बोलताना खासदार डॉ. वाघमारे यांनी सांगितले की, या या स्मारकासाठी त्या स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठपुरावा करतील. संतांच्या भूमीला साजेसे स्मारक उभारण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली. यावेळी ॲड. रमेश जोशी, प्रा. पठाण शिवशरण, हजरत काझी, अरुण शिवशरण, मस्तान मुल्ला, मंदिर समिती व वारी परिवाराचे सदस्य, शिक्षक आणि मोठ्या संख्येने वारकरी महिला उपस्थित होत्या.
धार्मिक कार्यक्रमांची मांदियाळी ५ ते ७ मे दरम्यान आयोजित या सोहळ्यात गुरुवारी सकाळी महाभिषेक, त्यानंतर ह.भ.प. निवृत्ती महाराज रामदास यांचे कीर्तन झाले. दुपारी १२ वाजता चैतन्यमय वातावरणात “पुष्पवृष्टी” करण्यात आली. दलित मित्र स्व. बाबासाहेब धुळा साळे यांच्या स्मरणार्थ प्रशांत पुंडलिक साळे यांच्या वतीने महाप्रसादाचे वाटप करून सोहळ्याची सांगता झाली