Headlines

चौथा श्रावणी सोमवार:वेरूळला 2 लाख भाविक दर्शनासाठी येण्याचा अंदाज, मंदिर प्रशासनाकडून तयारी पूर्ण‎



श्रावण महिन्यातील चौथ्या व शेवटच्या सोमवारच्या पार्श्वभूमीवर १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्री घृष्णेश्वर मंदिरात भाविकांची गर्दी उसळण्याची शक्यता आहे. दोन लाखांहून अधिक भाविक दर्शनासाठी येण्याचा अंदाज असून या पार्श्वभूमीवर मंदिर देवस्थान ट्रस्ट

.

सोमवारी पहाटेपासूनच सुरू होणाऱ्या गर्दीवर नियंत्रणासाठी पोलिस प्रशासनाकडून कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. गर्दीचे नियोजन करण्यासाठी विशेष बॅरिकेड्स आणि स्वतंत्र प्रवेश-बाहेर जाण्याचे मार्ग तयार करण्यात आले आहेत. भाविकांसाठी पिण्याचे पाणी, प्रथमोपचार आरोग्य सुविधा आणि सावलीची व्यवस्था करण्यात आली आहे. भाविकांना १५ मिनिटांत सुलभ व जलद दर्शन मिळावे असा प्रशासनाचा प्रयत्न आहे. २० पोलिस अधिकारी व १३३ पोलिस अंमलदार. होमगार्ड १६६ जवान, महाराष्ट्र सुरक्षा बलाचे २१ अधिकारी, मंदिर ट्रस्टचे ४० सुरक्षा रक्षक कार्यरत राहणार आहेत.

१५ मिनिटांत सुलभ दर्शन



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *