Headlines

‘जनता’मध्ये आरओ प्लँट लोकार्पण; गणवेश वाटप:न्यू एज्युकेशन सोसायटीचा सामाजिक उपक्रम‎




अंजनगाव बारी विद्यार्थ्यांना शुद्ध व स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे, आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवश्यक मदत मिळावी, या उद्देशाने न्यू एज्युकेशन सोसायटी, बडनेरा यांच्या वतीने जनता विद्यालयात विविध सामाजिक उपक्रम राबवले आहेत. त्यात शाळेत अत्याधुनिक आरओ प्लांट बसवण्यात आला असून, इयत्ता सहावी ते आठवीतील गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना गणवेशाचे वाटप केले. न्यू एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. हेमंत देव यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम झाला. शाळा समितीचे सभापती महादेवराव चकुले यांच्या हस्ते आरओ प्लांटचे उद्घाटन केले. या प्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष आनंदरावजी इंगोले, राजेश टारपे, कार्यकारिणी सदस्य रामेश्वरराव लाड, सोमेश्वर इंगोले, रमेश सुने, प्राचार्य गजेंद्र अवघड, पर्यवेक्षिका मनीषा चिंचोळकर यांच्यासह शिक्षक, पालक व विद्यार्थी उपस्थित होते. यादरम्यान उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना गणवेशाचे वाटप केले. अनेक विद्यार्थ्यांच्या कुटुंबांची आर्थिक परिस्थिती मर्यादित असल्याने या मदतीमुळे त्यांनादिलासा मिळाला आहे. शिक्षणासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याबरोबरच विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याचे कार्य या उपक्रमातून झाल्याची भावनाही व्यक्त केली. शाळेत बसवलेल्या आरओ प्लांटमुळे विद्यार्थ्यांना वर्षभर स्वच्छ, सुरक्षित,शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याचे संरक्षण होण्यास मदत मिळणार असून, शाळेतील मूलभूत सुविधांमध्येही भर पडली आहे. संस्थेच्या सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडवणाऱ्या या उपक्रमाचे पालक, शिक्षक व ग्रामस्थांनी स्वागत केले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अशा उपक्रमांची गरज असून, भविष्यातही अशाच लोकहितकारी उपक्रमांचे आयोजन करावे, अशी अपेक्षा उपस्थितांकडून व्यक्त होत आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *