Headlines

‘मी तिला मारले; खुनानंतर आईला केलेल्या कॉलमुळे पोलिसांना मिळाला सुगावा:मारेकऱ्याला गोंदियात ठोकल्या बेड्या, 8सप्टेंबरपर्यंत सुनावली पोलिस कोठडी‎



ंअल्पवयीन मुलीचा खून केल्यानंतर मारेकरी दुचाकीवरून बडनेराच्या दिशेने पळाला. त्यानंतर एक तास तो बडनेरातच फिरत होता. दुपारी पावणेतीन वाजेच्या सुमारास त्याने गीतांजली एक्स्प्रेस पकडून गोंदिया गाठले. गोंदियाला तो का गेला, याबद्दल त्याच्याकडे निश्चित योजन

.

आनंद नंदकिशोर भड (२२, रा. पोही, मूर्तिजापूर) असे पोलिसांनी अटक केलेल्या अल्पवयीन विद्यार्थिनीच्या मारेकऱ्याचे नाव आहे. या घटनेच्या वेळी त्याचा मोबाइल घटनास्थळीच पडला होता, त्यामुळे त्याचे मोबाइलवरुन लोकेशन घेणे पोलिसांसाठी शक्य नव्हते. मात्र, गोंदिया रेल्वे स्थानकावर उतरल्यानंतर त्याने अनोळखी व्यक्तीच्या मोबाइलवरून आईला कॉल करुन “मी तिला मारले आहे, असे सांगितले. मात्र तोपर्यंत त्याला हे माहीत नव्हते कि, तिचा या हल्ल्यात मृत्यू.झाला आहे.तत्पूर्वी, राजापेठ पोलिस, गुन्हे शाखेची पथके आरोपीच्या शोधासाठी मूर्तिजापूर, त्याच्या मूळ गाव परिसरात आली होती. आरोपीने आईला कॉल करताच पोलिसांना तो गोंदियात असल्याचे समजले. माहिती मिळताच अमरावती पोलिसांचे पथक गोंदियाला रवाना झाले. तत्पूर्वी राजापेठचे ठाणेदार संदीप चव्हाण यांनी गोंदिया पोलिसांना संशयिताला ताब्यात घेण्याबाबत पूर्वकल्पना दिली होती. त्यामुळे राजापेठ पोलिस गोंदियात पोहोचण्यापूर्वीच, गोंदिया पोलिसांनी गुरुवारी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास आरोपीला ताब्यात घेतले. शुक्रवारी राजापेठ पोलिसांनी आरोपीला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला ८ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

बडनेरा पोलिस ठाण्यातच उभी केली त्याने दुचाकी अल्पवयीन मुलीचा खून केल्यानंतर पोलिस पकडतील या भीतीने आनंद दुचाकीने बडनेराच्या दिशेने पळाला. काही वेळ बडनेरात फिरल्यानंतर, त्याने दुचाकी बडनेरा ठाणे आवारात उभी केली. तेथून पायी रेल्वे स्थानकावर गेला. ट्रेन पकडून तो गोंदियाला गेला. दरम्यान तपासात समोर आले की, आनंदने ३० रुपयांना चाकू खरेदी केला होता. त्याने त्या मुलीच्या गळ्यावर वार केला होता.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *