Headlines

जळगावात चार्जिंगच्या बहाण्याने घरात घुसून महिलेवर प्राणघातक हल्ला:गळ्यावर सर्जिकल ब्लेडने वार, हल्लेखाेर तरुण पाेलिसांच्या ताब्यात




मोबाइल डिस्चार्ज झाल्याचे सांगून घरात घुसलेल्या एका तरुणाने 33 वर्षीय महिलेच्या गळ्यावर सर्जिकल ब्लेडने प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना निवृत्ती नगर भागात घडली. ही घटना मंगळवारी दुपारी 3:20 वाजेच्या सुमारास घडली. घटनेनंतर पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीला स्थानिक नागरिकांनी पकडून चोप दिला आणि पोलिसांच्या स्वाधीन केले. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या महिलेवर रुग्णालयात उपचार सुरू असून, हल्ल्याचे मूळ कारण अद्याप अस्पष्ट आहे. निवृत्ती नगरातील स्वामी समर्थ केंद्राजवळ असलेल्या एका दुमजली इमारतीत राकेश पाटील आणि त्यांचे भाऊ राजेंद्र पाटील हे दोन भावांचे कुटुंब राहतात. खालील मजल्यावर राकेश तर वरील मजल्यावर राजेंद्र यांचे कुटुंब राहते. मंगळवारी दुपारी 3:15 वाजेच्या सुमारास याच परिसरात राहणारा सतीश मोतीलाल शिंदे हा तरुण दुसऱ्या मजल्यावर राजेंद्र पाटील यांच्या घरी गेला. त्यावेळी राजेंद्र यांची पत्नी गायत्री पाटील या घरी एकट्याच होत्या. सतीशने “माझा मोबाइल डिस्चार्ज झाला आहे, चार्ज करू द्या, असे सांगून घरात प्रवेश केला आणि मोबाइल चार्जिंगला लावला. ओरडण्याचा आवाज ऐकून धाव काही वेळातच गायत्री यांच्या जोरात ओरडण्याचा आवाज खाली राहणारे जेठ राकेश पाटील आणि त्यांच्या पत्नीला आला. गायत्री यांची आरोळी ऐकताच राकेश यांच्या पत्नीने तात्काळ वरच्या मजल्याकडे धाव घेतली. तिथे जाऊन पाहिले असता गायत्री या रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या दिसल्या आणि आरोपी सतीश एका बाजूला भिंतीजवळ उभा होता. राकेश आणि त्यांच्या पत्नीने घराचा लोखंडी दरवाजा धरून ठेवला आणि आरडाओरडा करून आसपासच्या लोकांना गोळा केले. त्यानंतर परिसरातील सामाजिक कार्यकर्ते राहुल पाटील यांनी तात्काळ पोलिसांना फोन केला. नागरिकांनी सतीशला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. गंभीर जखमी गायत्री यांना रुग्णवाहिकेतून प्रथम ‘आर. एल. हॉस्पिटल’मध्ये प्राथमिक उपचारासाठी नेण्यात आले, त्यानंतर तातडीने पुढील उपचारासाठी ‘जीएमसी’ रुग्णालयात दाखल करण्यात आले. अंगावर रक्ताच्या चिरकांड्या उडाल्या घटनेबाबत माहिती देताना जखमी महिलेचे जेठ राकेश पाटील यांनी सांगितले, “मी आणि माझी पत्नी जेवणाची तयारी करत होतो. अचानक वरच्या मजल्यावरून गायत्रीच्या ओरडण्याचा आवाज आला. माझी पत्नी लगेच वर पळाली आणि तिने मला लोकांना बोलावायला सांगितले. मी तातडीने आरडाओरडा करून लोकांना गोळा केले. त्यानंतर आम्ही दोघांनी जखमी अवस्थेतील गायत्रीला वरून खाली आणले. हल्लेखोर तिथेच शांत उभा होता. गायत्रीच्या गळ्यातून निघणाऱ्या रक्ताच्या चिरकांड्यांमुळे माझे कपडे पूर्णपणे रक्ताने भिजले होते.” गळ्यावर 6 ते 7 सेंमी लांब आणि गहरी जखम जीएमसी रुग्णालयातील डॉ. इम्रान पठाण यांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमी गायत्री यांच्या गळ्यावर केलेला वार धारदार सर्जिकल ब्लेडने केल्याचा अंदाज आहे. ही जखम सुमारे 6 ते 7 सेंटीमीटर लांब आणि 4 सेंटीमीटर खोल होती. रुग्णालयात दाखल करताच त्यांच्यावर तातडीने शस्त्रक्रिया करून टाके घालण्यात आले आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *