Headlines

भ्रष्ट ज्ञानेश कुमारचं कोर्ट मार्शल करा, अमित शहांना बरखास्त करा:संजय राऊतांचा मोदी सरकारवर हल्लाबोल, जनआंदोलनाचा इशारा




निवडणूक आयोगातील (ECI) अंतर्गत वादाच्या बातम्या समोर आल्यानंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आणि खासदार संजय राऊत यांनी अत्यंत आक्रमक पवित्रा घेत मोदी सरकार आणि निवडणूक आयोगावर आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्लाबोल केला आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार हे भ्रष्ट असून त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत मिळून देशाचे वाटोळे केले आहे, असा घणाघाती आरोप राऊत यांनी केला आहे. तसेच, वेळ पडल्यास राष्ट्रपतींनी लष्कराची मदत घेऊन ज्ञानेश कुमार यांना थेट तुरुंगात टाकावे, अशी मागणीही त्यांनी पत्रकार परिषदेत केली. ईसीआयच्या माध्यमातून निवडणुकांमध्ये बेईमानी निवडणूक आयोगात सध्या जे सुरू आहे, तो संविधानाशी केलेला गेल्या ८० वर्षांतील सर्वात मोठा खेळ असल्याचे राऊत म्हणाले. “ज्ञानेश कुमार यांनी अमित शहा यांच्या आदेशाने बेईमानी केली आहे. ईसीआयच्या माध्यमातून याच पद्धतीने पश्चिम बंगाल आणि बिहारच्या विधानसभा निवडणुका जिंकल्या गेल्या आहेत. निवडणूक आयोगातील सुखबीर संधू आणि विवेक जोशी या दोन आयुक्तांनीच ऑन रेकॉर्ड स्पष्ट केले आहे की ज्ञानेश कुमार हा लोकशाही विरोधी आणि भ्रष्ट माणूस आहे,” असा दावा राऊत यांनी केला. “राष्ट्रपतींनी आर्मीची मदत घेऊन देश वाचवावा” देशात हुकूमशाही राजवट सुरू असल्याचा आरोप करत राऊत यांनी थेट राष्ट्रपतींच्या हस्तक्षेपाची मागणी केली. “जर मोदी हे रोखू शकत नसतील, तर तिन्ही सेनादलाच्या प्रमुख असलेल्या राष्ट्रपतींनी हस्तक्षप केला पाहिजे. आज पोलीस अमित शहांच्या नियंत्रणात आहेत, त्यामुळे राष्ट्रपतींनी आर्मीची मदत घेऊन या निवडणूक आयुक्ताला ताबडतोब तुरुंगात टाकले पाहिजे. देशाशी बेईमानी करणाऱ्यांचे कोर्ट मार्शलच व्हायला हवे,” अशी उद्विग्न प्रतिक्रिया राऊत यांनी दिली. ‘मोदी हतबल, शहा आणि ट्रम्प करतायत ब्लॅकमेल’ यावेळी राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही अत्यंत शेलक्या शब्दांत टीका केली. “पंतप्रधान मोदी हे अत्यंत हतबल आणि असहाय्य झालेले दिसत आहेत. त्यांना अमित शहा ब्लॅकमेल करत आहेत आणि तिथून डोनाल्ड ट्रम्पही ब्लॅकमेल करत आहेत. जर मोदींमध्ये खरंच हिंमत असेल आणि त्यांना देश वाचवायचा असेल, तर त्यांनी सगळ्यात आधी अमित शहा यांना गृहखात्यावरून आणि मंत्रिमंडळातून बरखास्त केले पाहिजे,” असे राऊत म्हणाले. जनआंदोलनाचा इशारा; राज्याच्या प्रश्नांना बगल या मुद्द्यावरून देशभरातील विरोधी पक्ष एकत्र येत असून लवकरच मोठे जनआंदोलन उभारण्यात येईल. याबाबत आपली राहुल गांधी आणि इतर नेत्यांसोबत चर्चा सुरू असल्याचे राऊत यांनी स्पष्ट केले. दरम्यान, पत्रकारांनी महाराष्ट्रातील दुष्काळी दौऱ्याबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या नियोजनावर प्रश्न विचारला असता, राऊत यांनी निवडणूक आयोगाचाच मुद्दा सर्वात महत्त्वाचा असल्याचे सांगत त्या विषयावर बोलणे टाळले. हेही वाचा.. शेतकऱ्यांना 50 तर मजुरांना 25 हजारांची मदत द्या: पंचनामे सुरू होताच रोहित पवारांची सरकारकडे आक्रमक मागणी राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने 5 ऑक्टोबरपासून पंचनामे करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, या तारखेला कडाडून विरोध झाल्यानंतर आता सरकारने तातडीने पंचनामे सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. या निर्णयाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार रोहित पवार यांनी स्वागत केले असून, यासाठी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत. मात्र, मुख्यमंत्र्यांचे आभार मानतानाच त्यांनी काही प्रशासकीय अधिकाऱ्यांवर सडकून टीका केली आहे आणि मदतीच्या मुद्द्यावरून सरकारला गंभीर इशाराही दिला आहे. सविस्तर वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *