Headlines

IMD चा मोठा इशारा!:17 राज्यांत मुसळधार पावसाचा अलर्ट, महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांत अतिमुसळधार पावसाची शक्यता




काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने राज्यातील शेतकरी चिंतेत होते. पावसाअभावी अनेक भागांतील पिकांवर संकट ओढावलं होतं, तर शेतकऱ्यांच्या नजरा आभाळाकडे लागल्या होत्या. मात्र, आता राज्यात पुन्हा एकदा पावसाने जोर धरला आहे. गेल्या दोन-तीन दिवसांपासून अनेक भागांत पावसाच्या सरी कोसळत असून, काही ठिकाणी मुसळधार पाऊस झाला आहे. त्यातच पुढील काही दिवसांत पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे. विशेषतः विदर्भात 25 सप्टेंबरला अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पावसासोबत मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि जोरदार वारे वाहण्याची शक्यताही आहे. महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार ऑगस्ट महिन्यातील पावसाचा खंड आणि सप्टेंबरच्या सुरुवातीला कमी झालेला पाऊस यामुळे राज्यातील काही भागांमध्ये पिकांवर परिणाम झाला होता. अनेक शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत होते. मात्र, आता मान्सूनची स्थिती पुन्हा सक्रिय होताना दिसत आहे. गेल्या दोन-तीन दिवसांपासून राज्यातील विविध भागांत पावसाच्या सरी सुरू आहेत. IMDच्या 24 सप्टेंबरच्या अंदाजानुसार विदर्भात 25 सप्टेंबरला अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. 26 सप्टेंबरलाही काही भागांत मुसळधार पाऊस पडू शकतो. या काळात विजांचा कडकडाट आणि वादळी वारेही राहण्याची शक्यता आहे. चंद्रपूरमध्ये 25 सप्टेंबरला मुसळधार ते अतिमुसळधार पावसासह मेघगर्जना आणि 40 ते 50 किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याचा अंदाज आहे. अकोला आणि बुलढाण्यातही मेघगर्जनेसह पावसाची शक्यता असून, वाऱ्याचा वेग 40 ते 50 किमी प्रतितास राहू शकतो. मराठवाड्यातही वादळी पावसाचा इशारा मराठवाड्यात 24 सप्टेंबरला मुसळधार पावसासह मेघगर्जना आणि जोरदार वाऱ्याचा इशारा देण्यात आला आहे. 25 आणि 26 सप्टेंबरलाही मेघगर्जना आणि वादळी वारे राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी हवामानातील बदल लक्षात घेऊन काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. विदर्भातील ‘या’ भागांमध्ये पावसाचा जोर विदर्भासाठी हवामान विभागाचा इशारा विशेष महत्त्वाचा आहे. 25 सप्टेंबरला या भागात अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. गोंदियातही 25 सप्टेंबरला अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे, तर 26 सप्टेंबरला मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. अकोला, बुलढाणा आणि चंद्रपूरमध्येही पावसासोबत मेघगर्जना आणि जोरदार वाऱ्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकरी, वाहनचालक तसेच घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांनी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. देशातील इतर राज्यांमध्येही पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे. 25 सप्टेंबर रोजी उत्तर प्रदेश, बिहार, दिल्ली, राजस्थान, हरियाणा, उत्तराखंड, पंजाब, हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मीर, ओडिशा, आंध्र प्रदेश, तेलंगणा, पश्चिम बंगाल, झारखंड, छत्तीसगड आणि मध्य प्रदेशासह अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. विशेषतः ओडिशा, पश्चिम बंगाल आणि आंध्र प्रदेशमध्ये पावसाचा प्रभाव अधिक जाणवू शकतो. काही भागांत जोरदार वाऱ्यासह मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट होण्याची शक्यता असून, डोंगराळ भागात भूस्खलनाचा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे या राज्यांतील नागरिकांनी हवामान विभागाच्या सूचनांकडे लक्ष देत आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. शेतकऱ्यांनी काय काळजी घ्यावी? पावसासोबत विजांचा कडकडाट आणि वादळी वारे होण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांनी शक्यतो वादळी हवामानात शेतात जाणे टाळावे. शेतात काम करत असताना अचानक मेघगर्जना सुरू झाल्यास सुरक्षित ठिकाणी आसरा घ्यावा. झाडाखाली उभे राहणे टाळावे. मच्छिमारांनीही समुद्रातील हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन खबरदारी घ्यावी. पावसाचा जोर वाढल्यास नदी, नाले, धरण परिसर आणि सखल भागात जाणे टाळणे महत्त्वाचे आहे. नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन पुढील 24 ते 48 तासांत राज्यातील काही भागांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा. विजांचा कडकडाट आणि जोरदार वारे असताना घराबाहेर पडताना विशेष काळजी घ्यावी. स्थानिक प्रशासन आणि हवामान विभागाकडून जारी करण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करावे. दरम्यान, 25 सप्टेंबरनंतर 27 सप्टेंबरपासून महाराष्ट्रातील अनेक भागांतील इशाऱ्यांची तीव्रता कमी होण्याची शक्यता सध्याच्या IMD अंदाजात दिसत आहे. मात्र स्थानिक पातळीवरील हवामानात वेगाने बदल होऊ शकतो, त्यामुळे ताजे अपडेट पाहणे महत्त्वाचे आहे. हेही वाचा…. गोकुळच्या निवडणुकीत महायुतीची मोर्चेबांधणी:चंद्रकांत पाटलांनी सांगितला प्लॅन, 8 ऑक्टोबरला चित्र स्पष्ट होणार कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळच्या निवडणुकीला आता चांगलाच वेग आला आहे. निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर जिल्ह्यातील राजकीय हालचाली वाढल्या आहेत. या निवडणुकीत काँग्रेस नेते सतेज पाटील यांच्या नेतृत्वातील आघाडीविरोधात महायुती एकत्रितपणे मैदानात उतरण्याची तयारी करत आहे. याच पार्श्वभूमीवर महायुतीच्या नेत्यांची बैठक पार पडली. सविस्तर वाचा…



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *