![]()
संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या पदव्युत्तर विधी विभागातील एल.एल.एम. प्रथम वर्ष आणि द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी अमरावती शहर पोलीस आयुक्तालयाला अभ्यास भेट दिली. या भेटीदरम्यान पोलीस उपायुक्त प्रांजली सोनवणे आणि एम. बी. घुगे यांनी प्रशासकीय कामकाजाची माहिती दिली. यावेळी विधी अधिकारी अतुल विखार, पीयुष पाचकवडे आणि सारिका भोंगाडे यांनी विधी अधिकाऱ्यांचे कर्तव्य, सेवा, पोलिसांना मदत करणे आणि पी.आय.एल. यांसारख्या महत्त्वाच्या मुद्यांवर सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच पोलीस निरीक्षक सतिश पाटील आणि सहायक पोलीस निरीक्षक अनिकेत कासार यांनी सायबर गुन्हे, डिजिटल अरेस्ट, सायबर फ्रॉड आणि चाइल्ड पोर्नोग्राफी याविषयी कायदेशीर बाबी समजावून सांगितल्या. ए.पी.आय. मेघाली गावंडे यांनी महिला तक्रार निवारण आणि समुपदेशनाबद्दल माहिती दिली. विधी विभागप्रमुख डॉ. विजयकुमार चौबे, कार्यक्रम समन्वयक डॉ. कल्पना जावळे आणि मुरलीधर खोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम यशस्वी झाला. याप्रसंगी विधी विभागाचे प्रा. राजकुमार कटकतलवारे, प्रा. तृप्ती रावत, प्रा. तेजस्विनी काळे, प्रा. हेमलता आत्राम, प्रा. अजय वानखडे आणि एल.एल.एम.चे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांच्या शंका दूर केल्या आणि पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या.
Source link
अमरावती विद्यापीठाच्या विधी विभागाच्या विद्यार्थ्यांनी पोलीस आयुक्तालयाला दिली भेट:प्रशासकीय कामकाज, सायबर गुन्हे आणि महिला तक्रार निवारणाबद्दल घेतली माहिती