Headlines

मोर्शीत गणेश मंडळांनी आयोजित केले रक्तदान शिबिर:अनेकांनी पहिल्यांदाच केले रक्तदान, तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला




मोर्शी येथे अभिमन्यू गणेश मंडळ, जय भवानी गणेश मंडळ, उपजिल्हा रुग्णालय आणि रक्तदाता संघातर्फे रक्तदान शिबिर घेण्यात आले. सेवा संकल्प अभियानांतर्गत हे आरोग्य व रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. यावेळी शहरातील अनेक रक्तदात्यांनी रक्तदान करून समाजासमोर एक आदर्श ठेवला. समाजासाठी जगण्याची आणि दुसऱ्याचा जीव वाचवण्याची भावना जपण्यासाठी अभिमन्यू गणेश मंडळ आणि जय भवानी गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी हे शिबिर घेतले. या शिबिरात अनेक रक्तदात्यांनी स्वेच्छेने रक्तदान केले. त्यांच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबातून दुसऱ्याला नवजीवन देण्यासाठी त्यांनी आपली जबाबदारी पार पाडली. अनेकांनी पहिल्यांदाच रक्तदान करून सामाजिक जबाबदारीची जाणीव कृतीतून दाखवून दिली. जिल्ह्यात अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. अनेकदा अपघात झाल्यास रुग्णांना रक्ताची खूप गरज भासते. जिल्ह्यात रक्तदान शिबिरे कमी होत असल्याने रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. या पार्श्वभूमीवर हे शिबिर खूप महत्त्वाचे ठरले. सामाजिक बांधिलकी, मानवता आणि सुरक्षिततेचा संदेश देणारा हा उपक्रम भविष्यातही अनेकांना प्रेरणा देईल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला. मोर्शी रक्तदाता संघाचे अध्यक्ष डॉ. प्रदीप कुऱ्हाडे, कार्याध्यक्ष मिलिंद ढोले, कोषाध्यक्ष डॉ. प्रमोद पोतदार, सचिव गजानन हिरुळकर, सहसचिव अजय पाटील यांच्यासह अनेक सामाजिक कार्यकर्ते आणि संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. रक्तदान शिबिराच्या यशस्वीतेसाठी रोशन जयस्वाल, अमोल लांडे, धीरज शिरभाते, योगेश जैस्वाल, प्रफुल्ल पकडे, शुभम नरवरे, प्रीतम ढोले, विशाल वाघ, ऋतिक मेंढे, हर्षल ढोले, मयूर भुंते, ओम जयस्वाल, प्रफुल बडासे, आकाश बिजवे, पवन महल्ले, मोहित लांडे, प्रथमेश ढोले, गौरव गोरडे, मंथन बिजवे, अक्षय गोहत्रे, कुणाल मेंढे यासह दोन्ही मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले. रक्त संकलनाची जबाबदारी उपजिल्हा रुग्णालयाच्या डॉ. प्रेरणा वानखडे, प्रतीक्षा पांचाळे, सुजाता पांडे, स्वातीताई बुरंगे, श्रीकांत गोहाड, सुवर्णा श्रीराव, निकिता शहाणे, कांचन राऊत, अमोल झाडे, योगेश महाजन, सुजित वानखेडे आणि युसुफ शेख यांनी सांभाळली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *