Headlines

जळगाव जिल्हा भूकंपाच्या धक्क्यांनी हादरला:4.5 रिश्टर स्केल तीव्रतेची नोंद, मध्य प्रदेशातील खरगोनमध्ये केंद्रबिंदू




जळगाव शहरासह जिल्ह्यातील विविध भागांना आज सकाळी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवल्याने मोठी खळबळ उडाली आहे. सकाळी ९.१३ ते ९.२० वाजेच्या सुमारास हे धक्के जाणवले. अचानक घरातील वस्तू आणि पलंग हलू लागल्याने नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ४.५ मॅग्निट्यूड असल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून, त्याचा केंद्रबिंदू शेजारील मध्य प्रदेशातील ‘खरगोन’ येथे असल्याचे समजते. पाच तालुक्यांत जाणवले धक्के शनिवारी सकाळची वेळ असल्याने अनेक नागरिक घरातच होते. साधारण सव्वा नऊच्या सुमारास अचानक जमीन हादरल्याचा अनुभव नागरिकांना आला. प्राप्त माहितीनुसार, जळगाव शहरासह भुसावळ, यावल, रावेर, मुक्ताईनगर आणि बोदवड या तालुक्यांमध्ये भूकंपाचे हे धक्के प्रकर्षाने जाणवले आहेत. घरातील वस्तू हलू लागल्याने घबराट भूकंपाचा धक्का सौम्य असला तरी, अचानक घरातील भांडी, छताचे पंखे आणि इतर वस्तू हलू लागल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली. अनेक ठिकाणी पलंग आणि बेड हादरल्याचा अनुभव आल्याने लोक घाबरून घराबाहेर आले. काही क्षणांसाठी जमिनीला कंप जाणवल्याने परिसरात खळबळ उडाली होती. प्रशासनाकडून अधिकृत दुजोऱ्याची प्रतीक्षा सध्या समोर आलेल्या माहितीनुसार, या भूकंपाची तीव्रता ४.५ मॅग्निट्यूड आणि केंद्र मध्य प्रदेशातील खरगोन येथे असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, याबाबत स्थानिक प्रशासनाकडून आणि हवामान खात्याकडून अद्याप अधिकृत पुष्टी मिळणे बाकी आहे. सुदैवाने, या सौम्य धक्क्यांमुळे जिल्ह्यात कुठेही जीवितहानी किंवा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही. प्रशासनाकडून अधिकृत माहिती आणि अलर्ट मिळाल्यानंतरच या भूकंपाचे अचूक तपशील समोर येऊ शकतील. ————- हेही वाचा.. आईच्या डोळ्यांदेखत वाघाने 6 महिन्यांच्या बाळाला पाळण्यातून उचलले: हल्ल्यात चिमुकल्याचा मृत्यू, भंडाऱ्यातील घटना

घरात पाळण्यात झोपलेल्या अवघ्या सहा महिन्यांच्या चिमुकल्याला वाघाने घरात शिरून उचलल्याची धक्कादायक घटना शुक्रवार, १३ नोव्हेंबर रोजी सायंकाळी सुमारे ७ वाजताच्या सुमारास अड्याळ वन परिसरातील तिर्री येथे घडली. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या चिमुकल्याचा काही वेळातच मृत्यू झाला. अद्विक अभिमन बोंदरे (वय ६ महिने) असे मृत बालकाचे नाव आहे. या घटनेमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली असून ग्रामस्थांमध्ये भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. सविस्तर वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *