Headlines

जळगाव बनावट शालार्थ आयडी प्रकरण:फरार विनोद तराळ यांच्या सूचकाची एसआयटीकडून चौकशी; तराळांच्या अडचणी वाढल्या




जळगाव जिल्ह्यातील गाजत असलेल्या बनावट शालार्थ आयडी प्रकरणात एक मोठी घडामोड समोर आली आहे. या घोटाळ्यातील फरार संशयित विनोद तराळ यांचा जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक (JDCC Bank) निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करणारे सूचक दिलीप पाटील यांची एसआयटीकडून (SIT) कसून चौकशी करण्यात आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या चौकशीतून महत्त्वाचे धागेदोरे हाती लागण्याची शक्यता आहे. विनोद तराळ हे अंतुर्ली येथील तराळ विद्यालयाचे संस्थाचालक आहेत. शिक्षण क्षेत्रातील बहुचर्चित बनावट शालार्थ आयडी घोटाळ्यात त्यांचा सहभाग असल्याचा संशय आहे. या प्रकरणात कारवाई टाळण्यासाठी त्यांनी केलेला अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने नामंजूर केला आहे. तेव्हापासून ते पोलिसांना गुंगारा देत असून एसआयटीचे पथक त्यांचा कसून शोध घेत आहे. फरार असतानाही निवडणुकीचा अर्ज एकीकडे पोलीस शोध घेत असताना आणि स्वतः फरार असतानाही विनोद तराळ यांनी थेट जिल्हा बँकेच्या निवडणुकीत उडी घेतली. त्यांनी स्वतः समोर न येता त्यांचे सूचक दिलीप पाटील यांच्या माध्यमातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. फरार आरोपीने अशा प्रकारे अर्ज भरल्याने तपासाला नवी दिशा मिळाली असून, याच पार्श्वभूमीवर एसआयटीने सूचक दिलीप पाटील यांना चौकशीसाठी पाचारण केले होते. राजकीय वर्तुळात खळबळ एका फरार संशयिताने पोलिसांच्या नाकावर टिचून बँकेसारख्या महत्त्वाच्या निवडणुकीत आपला उमेदवारी अर्ज दाखल केल्याने जळगावच्या राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. कायद्याच्या कचाट्यातून वाचण्यासाठी लपून बसलेला एक संशयित आरोपी अशा प्रकारे निवडणूक प्रक्रियेत कसा सहभागी होऊ शकतो आणि त्याला मदत करणारे कोण आहेत, असे अनेक प्रश्न या निमित्ताने आता उपस्थित केले जात आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *