Headlines

जिल्हा बँक निवडणुकीत घराणेशाहीचा ‘सहकार’:निष्ठावंतांच्या हाती सतरंज्या, आजी-माजी आमदारांच्या 9 पाल्यांसह 5 लोकप्रतिनिधी प्रथमच निवडणुकीत




जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक पारंपरिकदृष्ट्या कार्यकर्त्यांची निवडणूक मानली जाते. मात्र, यंदाच्या निवडणुकीत कार्यकर्त्यांना डावलून दिग्गज नेते, त्यांची मुले-मुली, भाऊ आणि इतर कुटुंबीयांनाच अधिक संधी दिली जात असल्याचे चित्र आहे. विधानसभा, महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांप्रमाणेच आता सहकार क्षेत्रातही घराणेशाहीचा शिरकाव झाल्याने निष्ठावान कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. जिल्हा बँक निवडणुकीचा सध्या जोरदार धुरळा उडाला आहे. निवडणूक जाहीर झाल्यानंतर पहिल्या तीन दिवसांत एकही अर्ज दाखल झाला नव्हता. मात्र, त्यानंतर दिग्गज नेते आणि त्यांच्या कुटुंबीयांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात केली. पालकमंत्री संजय शिरसाट, ओबीसी कल्याण मंत्री अतुल सावे, खासदार संदिपान भुमरे, खासदार डॉ. कल्याण काळे, आमदार अनुराधा चव्हाण आणि आमदार रमेश बोरनारे या विद्यमान लोकप्रतिनिधींनी स्वतःचे उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. यासोबतच अनेक नेत्यांनी आपल्या कुटुंबीयांनाही निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. कार्यकर्त्यांना संधी मिळेल अशी अपेक्षा असताना, अनेक नेत्यांनी स्वतःसह आपल्या कुटुंबीयांना उमेदवारी दिल्याने जिल्हा बँक निवडणुकीत घराणेशाहीचा प्रभाव ठळकपणे दिसून येत आहे. जिल्हा बँक म्हणजे ग्रामीण राजकारणाचे प्रवेशद्वार सहकार क्षेत्र हे ग्रामीण राजकारणाचे प्रवेशद्वार मानले जाते. त्यामुळे जिल्हा बँकेवर वर्चस्व मिळवण्यासाठी राजकीय पक्ष आणि नेत्यांमध्ये मोठी चुरस पाहायला मिळते. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर, अनेक नेते आपल्या पुढच्या पिढीला सहकाराच्या माध्यमातून राजकारणात स्थिर करण्याचा प्रयत्न करत असल्याचे या उमेदवारीवरून स्पष्ट होते. पराभूत आणि संधीपासून वंचित नेतेही मैदानात महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये पराभूत झालेले किंवा उमेदवारीची संधी न मिळालेले नेतेही आता जिल्हा बँक निवडणुकीत आपले नशीब आजमावत आहेत. यामध्ये प्रामुख्याने राजू शिंदे, पूनमचंद बमणे, संदीप बोरसे, राजूकाका शेळके. प्रथमच निवडणुकीत उतरलेले लोकप्रतिनिधी यंदाच्या निवडणुकीचे एक वैशिष्ट्य म्हणजे अनेक बडे नेते पहिल्यांदाच जिल्हा बँकेच्या आखाड्यात उतरले. घराणेशाहीतील उमेदवार आणि त्यांचे नाते



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *