Headlines

जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्षपद 2 वर्षे‎ शिवसेनेकडे:आमदार भुमरेंचे नाव निश्चित‎, उपाध्यक्षपदासाठी भाजपच्या परदेशी यांची चर्चा‎



जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या‎अध्यक्षपदासाठी शिंदेसेनेकडून आमदार‎विलास भुमरे व उपाध्यक्षपदासाठी भाजपचे‎दिनेश परदेशी यांच्या नावावर शिक्कामोर्तब‎करण्यात आले आहे, अशी माहिती‎विश्वसनीय सूत्रांनी दिली. सोमवारी बँकेच्या‎संचालक मंडळाच्या बैठकीत अध्यक्ष

.

अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी शनिवारी‎मॅरेथॉन बैठका झाल्या. त्यानंतर रविवारी‎पालकमंत्री संजय शिरसाट आणि ओबीसी‎विकास मंत्री अतुल सावे यांच्या घरीही बैठका‎झाल्या. अध्यक्ष, उपाध्यक्षपदांबाबत‎बैठकांमध्ये घेतलेला निर्णय मुंबईत मुख्यमंत्री‎देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व‎सुनेत्रा पवार यांना कळवण्यात आला. अध्यक्ष,‎उपाध्यक्षांची नावे व दोन्ही पदांच्या वाटपाबाबत‎ठरलेल्या सूत्रावर तिन्ही नेत्यांनी शिक्कामोर्तब‎केल्याचे सूत्रांनी सांगितले.‎

बँकेच्या सर्व संचालकांना‎ बैठकीचे दिले निमंत्रण

सोमवारी जिल्हा मध्यवर्ती सहकारी‎बँकेची बैठक आहे. यामध्ये‎संचालकांच्या बैठकीत अध्यक्ष आणि‎उपाध्यक्ष निवडला जाणार आहे. या‎पार्श्वभूमीवर सर्व संचालकांना‎खासदार भुमरे यांच्या माध्यमातून‎निमंत्रण देण्यात आले. दिनेश परदेशी‎यांच्या माध्यमातून भाजप‎संचालकांना सकाळी उपस्थित‎राहण्यासंदर्भात फोन केल्याची‎माहिती सूत्रांनी दिली आहे.‎

चौथे वर्ष ठरेल महत्त्वाचे ‎

शिंदेसेनेला २०२६ व २०२७ या‎कालावधीत अध्यक्षपद दिले‎आहे. २०२९मध्ये लोकसभा,‎विधानसभा निवडणुका होणार‎आहेत. त्यामुळे अध्यक्षपदाचे‎चौथे वर्ष महत्त्वाचे ठरणार आहे.‎विशेष: लोकसभा मतदारसंघावर‎बँकेच्या अध्यक्षांचा प्रभाव‎असतो. त्यामुळे निवडणुकीवेळी‎अध्यक्षपदी आपल्याकडे राहिले‎पाहिजे, यासाठी भाजपचा प्रयत्न‎राहणार आहे.‎‎

बिनविरोध अध्यक्ष होणार‎

महायुतीतील तिन्ही पक्षाच्या बैठका‎दिवसभर झाल्या. महायुतीचाच अध्यक्ष‎व्हावा आणि बिनविरोध व्हावा यासाठी‎आमचा प्रयत्न होता. त्यानुसार‎बिनविरोध अध्यक्ष निवडला जाईल.‎ – सतीश चव्हाण, आमदार, राष्ट्रवादी‎काँग्रेस पक्ष‎

शिवसेनेचा अध्यक्ष ठरला‎

जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत २‎वर्षे शिवसेना, २ वर्षे भाजप आणि १ वर्ष‎राष्ट्रवादी काँग्रेस असा फॉर्म्यूला ठरला आहे.‎पहिल्यांदा शिवसेनेचा अध्यक्ष होणार आहे.‎सर्वासोबत चर्चा करून हा निर्णय घेण्यात‎आला आहे.‎ – संजय शिरसाट, पालकमंत्री

खासदार संदिपान भुमरे यांनी ‎सांभाळली शिवसेनेची सर्व सूत्रे‎

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेची ‎सूत्रे खासदार संदीपान भुमरे यांच्याकडे दिली ‎होती. पालकमंत्री संजय शिरसाट आणि‎ आमदार अब्दुल सत्तार यांच्या माध्यमातून ‎शिवसेनेने एकत्र येत ही निवडणूक लढवली.‎मनपा आणि जिल्हा परिषदेत बसलेल्या ‎धक्क्यानंतर शिवसेनेकडून पूर्ण ताकदीने ही ‎निवडणूक लढविली. अध्यक्षपदासाठी‎ संख्याबळाचे गणित अडचणीचे ठरू शकते हे‎ लक्षात घेत जागा जास्त लढवल्या. भाजपची ‎सूत्रे मंत्री अतुल सावे यांच्याकडे होती .‎



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *