Headlines

जेऊरवाडीत जन्मेर लडी सोहळा समाप्ती:श्रावण मास समाप्तीनिमित्त केले हाेते आयाेजन ‎




जेऊरवाडी (ता. अक्कलकोट) येथे श्रावण मासानिमित्त संपूर्ण महिना भजन, कीर्तनाचे कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात संत सेवालाल मंदिर आणि जगदंबा मंदिरात श्रावण मासानिमित्त संत सेवालाल महाराज यांच्या जन्मेर लडी या पवित्र श्रद्धा आणि आद्वितीय धार्मिक कार्यक्रमामुळे गावात भक्तीमय वातावरण निर्माण झाले होते. यंदा प्रथमच सेवालाल महाराज यांचे जन्मेर लडीपासून ते स्वर्गेरी लडी हा महान कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. यात श्रावण प्रारंभापासून संत सेवालाल यांचे जन्म लडी व स्वर्गेर लडी या कार्यक्रमाच्या आयोजनाने ग्रामस्थांना विविध धार्मिक आणि भक्तिमय वातावरणाची पर्वणी मिळाली. मंदिरात रोज पूजा, होम हवन उपासना करण्यात आले. दररोज रात्री संत सेवालाल महाराज यांच्या जीवन चरित्रावर आधारित भजनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमासाठी महिला वर्ग व पुरुषांची मोठी गर्दी होती. या वेळी मंदिर समितीतर्फे विविध कार्यक्रमासाठी योग्य नियोजन केले होते. शुक्रवारी तुपाचा भोग लावण्यात आला. त्यानंतर महाप्रसाद वाटप केला. शुक्रवारी रात्री सेवालाल महाराज यांचे जन्म लडी व स्वर्गेरी लडी या कार्यक्रमाची समाप्ती केली. या वेळी मानसिंग महाराज आणि शिवलाल महाराज यांनी संत सेवालाल महाराज यांच्या सामाजिक व जन्म लडी आणि स्वर्गेरी लडी यावर भजनाच्या माध्यमातून प्रबोधन केले. या कार्यक्रमासाठी नाईक श्रीमंत राठोड, सरपंच गोपीचंद राठोड, मंदिर समिती अध्यक्ष अंबादास राठोड, माजी उपसरपंच श्रीमंत राठोड, हिरालाल राठोड, शिवाजी राठोड आदींनी परिश्रम घेतले. अक्कलकोट स्टेशन परिसरातील भाविक उपस्थित होते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *