![]()
येथील मविप्र संस्थेच्या कर्मवीर आबासाहेब तथा ना. म. सोनवणे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात तालुकास्तरीय फुटबॉल स्पर्धांचे उत्साहात आयोजन करण्यात आले. बागलाण तालुक्यातील १४ शाळांमधील तब्बल २२० विद्यार्थ्यांनी स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. स्पर्धेचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य अनिल पाटील व तालुका क्रीडा समन्वयक गणेश वाघ यांच्या हस्ते झाले. यावेळी प्राचार्य प्रा. अनिल पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. फुटबॉल हा केवळ मनोरंजनाचा खेळ नसून शारीरिक, मानसिक व सामाजिक विकासाचे प्रभावी माध्यम असल्याचे त्यांनी सांगितले. खेळातून सांघिक भावना, शिस्त, नेतृत्वगुण, वेळेचे नियोजन व परस्पर सहकार्याची भावना विकसित होते. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाला चालना मिळते, असे त्यांनी नमूद केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अमित निकम यांनी केले. प्रास्ताविक व आभार क्रीडा संचालक प्रा. दीपक दळवी यांनी मानले. क्रीडाशिक्षक विनायक सोनवणे, जावेद शहा, मोसम शहा, साजिद मन्सुरी, हेमा गोरे आदींनी स्पर्धेसाठी परिश्रम घेतले. या १४ शाळांतील खेळाडू सहभागी आदर्श इंग्लिश मीडियम, सटाणा; बागलाण इंग्लिश मीडियम; जय मल्हार स्कूल, भाक्षी; किलबिल इंग्लिश मीडियम, सटाणा; मराठा हायस्कूल, सटाणा; जिजामाता गर्ल्स हायस्कूल, सटाणा; ब्लॉसम इंग्लिश मीडियम, सटाणा यांच्यासह तालुक्यातील एकूण १४ शाळांनी सहभाग घेतला.
Source link
फुटबॉल स्पर्धेत 220 विद्यार्थ्यांचा सहभाग:बागलाणच्या 14 शाळांचा प्रतिसाद; सटाणा महाविद्यालयामध्ये आयोजन