Headlines

जेसीबीची धडक; दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू:महिला गंभीर, आळंद येथील राष्ट्रीय महामार्गावर घडली घटना‎




आळंद-सिल्लोड मार्गावर विनाक्रमांकाच्या जेसीबीने दुचाकीला दिलेल्या धडकेत ३६ वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर दुचाकीवरील महिला गंभीर जखमी झाली. हा अपघात मंगळवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास घडला. सिल्लोडकडून वडोद बाजारच्या दिशेने जाणाऱ्या दुचाकीला एका विनाक्रमांकाच्या जेसीबीने जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार विक्रम मधुकर पारखे (३६, रा. महालकिन्होला, ता. फुलंब्री) आणि गंगूबाई प्रल्हाद म्हस्के (४५, रा. वडोद बाजार) हे दोघेही गंभीर जखमी झाले. स्थानिक नागरिकांनी त्यांना आळंद येथील रुग्णालयात दाखल केले. दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना उपचारासाठी संभाजीनगर येथे हलवण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान विक्रम पारखे यांचा मृत्यू झाला. जखमी गंगूबाई म्हस्के यांच्यावर उपचार सुरू आहेत. हा अपघात नेमका कशामुळे घडला, याचा तपास सुरू असून रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *