Headlines

पैठणमध्ये छत्रपती शिवरायांच्या शौर्याचा जागर:मंडळाची 19 वर्षांची परंपरा; ‘भवानी मातेची दिव्य तलवार’ ठरतेय आकर्षण‎




पैठण गणेशोत्सवाच्या पारंपरिक आणि भक्तिमय उत्साहाला इतिहासाच्या उज्ज्वल वैभवाची जोड देत पैठण येथील श्री सिद्धिविनायक सार्वजनिक व्यापारी गणेश मंडळाने यंदा छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील ऐतिहासिक प्रसंगाला भव्य रूपात साकारले आहे. ३० फुटांच्या भव्य देखाव्यातून ‘छत्रपती शिवाजी महाराजांना तुळजाभवानीचा साक्षात्कार’ हा प्रसंग जिवंतपणे उभा केला असून हा देखावा पैठण शहर व परिसरातील गणेशोत्सवाचे मुख्य आकर्षण ठरत आहे. पैठणकरांचे श्रद्धेचे स्थान असलेल्या श्री सिद्धिविनायक सार्वजनिक व्यापारी गणेश मंडळाची स्थापना झाल्यापासून सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात मंडळ नेहमीच अग्रेसर राहिले आहे. आमदार विलास भुमरे यांच्या अध्यक्षतेखाली या मंडळाने गेल्या १९ वर्षांपासून गणेशोत्सवात दरवर्षी ऐतिहासिक, सामाजिक आणि राष्ट्रभक्तिपर विषयांवर आधारित दिव्य देखावे साकारण्याची समृद्ध परंपरा जपली आहे. याच परंपरेचे सातत्य राखत यंदाही मंडळाने स्वराज्य, शौर्य आणि राष्ट्रभक्तीचा प्रखर जागर केला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनात कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेचे स्थान अत्यंत अनन्यसाधारण व श्रद्धेचे मानले जाते. त्यामुळे हा देखावा सादर करण्यात आला आहे. गणेशोत्सवाच्या या पावन पर्वात भाविकांना धार्मिक अनुभूतीसोबतच आपल्या गौरवशाली इतिहासाची पुनरावृत्ती व्हावी आणि नव्या पिढीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांची व कार्याची प्रेरणा मिळावी हा देखावा साकारण्यामागील उद्देश असल्याचे गणेश मंडळाचे संस्थापक अध्यक्ष किशोर चौहान यांनी सांगितले. ३० फुटी भव्य देखाव्यात दाखवण्यात आलेली ‘भवानी मातेची तलवार’ भाविकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे. या तलवारीला केवळ एक भौतिक शस्त्र म्हणून सादर न करता ती शक्ती, अथांग आत्मविश्वास, निष्ठा आणि संघर्षाचे जिवंत प्रतीक म्हणून प्रभावीपणे मांडले आहे. अद्ययावत प्रकाश योजना, प्रतिकृती, प्रसंगाची मांडणी यामुळे देखाव्याला जिवंतपणा आला आहे. Ãस्वराज्याची प्रेरणा, राष्ट्रभक्तीचा संदेश देणारे हे देखावे महान इतिहासाची प्रत्यक्ष साक्ष देत आहेत. – विलास भुमरे , आमदार, पैठण



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *