Headlines

ज्ञानयज्ञ फाउंडेशनतर्फे 25 नोव्हेंबरपासून 'पद्म फेस्टिव्हल':सरसंघचालक मोहन भागवतांच्या हस्ते होणार उद्घाटन; विद्यार्थ्यांसाठी 70 टक्के आसनव्यवस्था राखीव




ज्ञानयज्ञ फाउंडेशनतर्फे “पद्म फेस्टिव्हल’चे पाचवे पर्व 25 ते 27 नोव्हेंबर या कालावधीत होणार आहे. महोत्सवाचे उद्घाटन 25 नोव्हेंबरला सकाळी 10.45 वाजता मोहन भागवत यांच्या हस्ते होईल. प्रमुख अतिथी म्हणून जनरल अनिल चौहान उपस्थित राहणार आहेत. संमेलनाध्यक्ष मिलिंद केळकर आणि स्वागताध्यक्ष उन्मेष टाकळकर असतील. नव्या पिढीला प्रेरणा देण्यासाठी विविध क्षेत्रांतील पद्म पुरस्कारप्राप्त मान्यवरांच्या 12 संवादसत्रांसह सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. पहिल्या दिवशीचे सत्रे बीड बायपास रोडवरील एमआयटीच्या मंथन सभागृहात, तर पुढील दोन दिवसांचे कार्यक्रम संत एकनाथ रंगमंदिर येथे होतील. प्रवेश निःशुल्क असून 70 टक्के आसनव्यवस्था विद्यार्थ्यांसाठी राखीव ठेवण्यात आली आहे, अशी माहिती आयोजकांनी दिली. तेव्हा या कार्यक्रमांचा संभाजीनगरकरांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. महोत्सवाचे आयोजन आणि पहिल्या दोन दिवसांची रूपरेषा महोत्सवाच्या यशस्वितेसाठी ज्ञानयज्ञ फाउंडेशनसह मंगल केंडे आणि कांचन देशपांडे पुढाकार घेत असून, अधिक माहितीसाठी अमित जोशी, अतुल चपळगावकर, आयुष अग्रवाल, सर्जन कॅप्टन मोहन रोटे आणि पद्मश्री केंडे यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 25 नोव्हेंबरला एमआयटीच्या मंथन सभागृहात वैद्यकशास्त्र तज्ज्ञ डॉ. पद्मा बंडोपाध्याय, साहित्य व शिक्षणतज्ज्ञ रमेश पतंगे आणि डॉ. एन. राजम यांची संवादसत्रे होतील. सायंकाळी डॉ. एन. राजम व अभिषेक सिन्हा यांचे व्हायोलिन वादन होईल, ज्याला अजित पाठक तबल्याची साथ देतील. 26 नोव्हेंबरला संत एकनाथ रंगमंदिरात वैज्ञानिक डॉ. शुभा व्ही. अय्यंगार, मनोविकारतज्ज्ञ डॉ. बी.एन. गंगाधर, भालाफेकपटू देवेंद्र झाझरिया, तारपा वादक भिकल्या धिंडा, कृषी तज्ज्ञ श्रीरंग लाड आणि गायिका पद्मजा फेणाणी-जोगळेकर यांची संवादसत्रे पार पडतील. रात्री पद्मजा फेणाणी-जोगळेकर यांच्या शिष्यवृंदाकडून (डॉ. चैती देशपांडे गुलवाडी, तन्वी जानोरकर, ईशानी हिंगे, गौरी मिश्रा) मंदार पारखी व मनोज देसाई यांच्या साथीने ‘मंगलदीप’ कार्यक्रमाचे सादरीकरण होईल. 27 नोव्हेंबरचे कार्यक्रम आणि महोत्सवाचा समारोप महोत्सवाच्या शेवटच्या दिवशी, 27 नोव्हेंबरला संत एकनाथ रंगमंदिरात सकाळी 10 वाजता मार्शल आर्ट्स खेळाडू पद्मश्री फैसल अली डार यांचे संवादसत्र होईल. त्यानंतर सकाळी 11:45 ते दुपारी 1:00 या वेळेत महोत्सवाचा समारोप समारंभ पार पडेल. याप्रसंगी डेप्युटी चीफ ऑफ इंटिग्रेटेड डिफेन्स स्टाफ (मेडिकल) सर्जन व्हाइस ॲडमिरल कृष्णा एम. अधिकारी हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. या मुख्य समारंभानंतर दुपारी 1:30 वाजता पर्यावरणवादी चामी मुर्मू आणि दुपारी 3:10 वाजता बांबू हस्तकला कलाकार जारदेन लेप्चा यांच्या सत्रांनी या तीन दिवसीय महोत्सवाची शानदार सांगता होईल.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *