Headlines

ज्यांनी बाळासाहेबांचे विचारच फाडले त्यांना बोलण्याचा अधिकार नाही:योगेश कदमांचा पलटवार, म्हणाले- बाळासाहेबांना '75 वर्षांचा म्हातारा' म्हणणाऱ्या अंधारेंकडून धडे नकोत!




काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्या पुस्तकाचा निषेध करताना शिवसेना (शिंदे गट) प्रवक्त्या शायना एन. सी. यांच्या हातून बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो फाटल्याच्या आरोपावरून विरोधकांनी सुरू केलेल्या आंदोलनाला राज्याचे गृहराज्यमंत्री आणि शिवसेना नेते योगेश कदम यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. “तो फोटो बाळासाहेबांनी मणिशंकर अय्यर यांच्याविरोधात केलेल्या ‘जोडे मारो’ आंदोलनाचा होता आणि त्यातील केवळ मणिशंकर अय्यर यांचाच फोटो फाडला गेला आहे, बाळासाहेबांचा फोटो कुठेही फाडला गेलेला नाही, हे व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे. तरीही विरोधक केवळ मुंबई महानगरपालिका निवडणुका समोर ठेवून याचे राजकारण करत आहेत. ज्यांनी बाळासाहेबांचे विचारच फाडले, त्यांना आमच्यावर बोलण्याचा कोणताही अधिकार नाही,” अशा तिखट शब्दांत योगेश कदम यांनी ठाकरे गटावर हल्लाबोल केला आहे. गुरुवारी (19 नोव्हेंबर) माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी ही भूमिका मांडली. 75 वर्षांच्या म्हाताऱ्याच्या हातात तलवार कशी दिसते, अशी खिल्ली उडवणाऱ्यांनी आम्हाला शिकवू नये या प्रकरणावरून टीका करणाऱ्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) नेत्या सुषमा अंधारे आणि खासदार संजय राऊत यांचा योगेश कदम यांनी खरपूस समाचार घेतला. सुषमा अंधारे यांनी यापूर्वी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोटो फाडून पाण्यात बुडवला होता. इतकेच नव्हे, तर याच सुषमा अंधारे यांनी कधीकाळी वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचा ’75 वर्षांचा म्हातारा’ असा उल्लेख करत ’75 वर्षांच्या म्हाताऱ्याच्या हातात तलवार कशी दिसते,’ अशी खिल्ली उडवली होती. अशा सुषमा अंधारे यांच्याकडून आम्हा शिवसैनिकांना धडे घेण्याची अजिबात आवश्यकता नाही, असे कदम यांनी ठणकावले. संजय राऊतांच्या टीकेला प्रत्युत्तर संजय राऊत यांनी केलेल्या खालच्या पातळीच्या टीकेवर बोलताना कदम म्हणाले की, शायना एन. सी. यांनी या प्रकरणावर स्पष्टीकरण दिले असून आमचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनीही आपली भूमिका मांडली आहे. तरीही हा विषय केवळ आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वाढवला जात आहे. ‘बाळासाहेब फक्त आमचेच आहेत आणि आम्हीच त्यांचे विचार पुढे नेतोय’ असे दाखवण्याचा हा केविलवाणा प्रयत्न असून, याबाबत अंतिम निर्णय शिवसैनिक आणि जनतेच्या दरबारातच होईल. भेंडीबाजारातील दाऊदच्या घरावरील कारवाईचे समर्थन; “अशी प्रवृत्ती नेस्तनाबूत करणार” दरम्यान, दक्षिण मुंबईतील भेंडी बाजार परिसरात कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम याच्या वडिलोपार्जित घरावर आणि संबंधित मुसाफिरखाना इमारतीवर मुंबई महानगरपालिकेकडून करण्यात आलेल्या पाडकाम कारवाईचे योगेश कदम यांनी स्वागत केले. मुंबईत दाऊदचे घर पाडण्यात आले आहे; अशी गुन्हेगारी आणि देशविरोधी प्रवृत्ती महाराष्ट्रातून पूर्णपणे नेस्तनाबूत व्हावी, यासाठीच आमच्या सरकारची पावले पडत असतात, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. —————————————————– हेही वाचा एसआरए 33(11) प्रकल्पांचे मुंबईतील सर्वात मोठे लाभार्थी राऊत बंधूच: नवनाथ बन यांचा पलटवार, टिपू सुलतान प्रकरणावरून अमित देशमुखांवरही टीका झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या (एसआरए) प्रकल्पांमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप करणाऱ्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांच्यावर भारतीय जनता पक्षाचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी पुराव्यानिशी जोरदार पलटवार केला आहे. “ज्या 33(11) योजनेतील प्रकल्पांवर संजय राऊत आक्षेप घेत आहेत, त्या प्रकल्पांचे मुंबईतील सर्वात मोठे लाभार्थी स्वतः राऊत बंधू आणि त्यांच्याशी संबंधित ‘श्रद्धा’ ग्रुपच्या कंपन्या आहेत,” असा खळबळजनक आरोप नवनाथ बन यांनी केला आहे. गुरुवारी (19 नोव्हेंबर 2026) मुंबईतील भाजप प्रदेश कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी काँग्रेस आमदार अमित देशमुख यांचा लातूरमधील टिपू सुलतान कार्यक्रमातील नोटा उधळण्याचा प्रकार, बाळासाहेब ठाकरे यांच्या फोटो फाडण्याचा वाद आणि दादर रेल्वे स्थानकाचे ‘चैत्यभूमी’ नामकरण या मुद्द्यांवरून विरोधकांवर चौफेर हल्लाबोल केला. येथे वाचा संपूर्ण बातमी



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *