![]()
पुण्यातील रास्ता पेठेतील इंग्रजी माध्यमाच्या शाळेच्या ४१ वर्षीय मुख्याध्यापिकेविरुद्ध जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी समर्थ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. शाळेतील कर्मचारी महिलेने समर्थ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. तक्रारीनुसार, १८ ऑक्टोबरला मुख्याध्यापिकेने जातीवाचक शिवीगाळ केली आणि ‘तुमची काम करायची लायकी नाही’ असे म्हणत अपमानित केले, असा आरोप महिलेने केला आहे. तक्रारदार महिला आणि मुख्याध्यापिका याच शाळेत काम करतात. या प्रकरणी ॲट्रोसिटी ॲक्टच्या कलम ३ (१) (आर), ३ (१) (एस) आणि भारतीय न्याय संहितेच्या कलम ३५१ (१), ३५२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिलेने केलेल्या आरोपांनुसार पोलिसांनी ही नोंद केली आहे. फरासखाना विभागाचे सहायक पोलीस आयुक्त सचिन हिरे या प्रकरणाचा तपास करत आहेत. एसटी प्रवासात महिलेचे दागिने लंपास एसटी प्रवासी महिलेच्या पिशवीतून आठ लाख ७० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरट्यांनी लांबविल्याची घटना उघडकीस आली. या प्रकरणी स्वारगेट पोलिसांनी चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. याबाबत एका ज्येष्ठ महिलेने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ज्येष्ठ महिला सोलापूर जिल्ह्यातील मोहोळमधील पापरी गावच्या रहिवासी आहेत. त्या मोडनिंब ते स्वारगेट स्थानक या मार्गावरील बसमधून प्रवास करत होत्या. मोडनिंब ते स्वारगेट दरम्यान प्रवासात महिलेच्या पिशवीतून चोरट्याने सोन्याचे दागिने लांबविले. स्वारगेट स्थानकात ज्येष्ठ महिला उतरल्या. पिशवीची तपासणी केली. तेव्हा दागिने चोरीचा प्रकार उघडकीस आला. स्वारगेट पोलिस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक एस आवारे पुढील तपास करत आहेत.
Source link
मुख्याध्यापिकेविरुद्ध 'ॲट्रोसिटी'चा गुन्हा:पुण्यातील इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील महिला कर्मचाऱ्याची पोलिस ठाण्यात तक्रार