![]()
पुण्यात ज्येष्ठ साहित्यिक दयानंद मस्के यांचा ८४वा वाढदिवस साजरा होणार आहे. या निमित्ताने केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते त्यांचा नागरी सत्कार आणि ग्रंथ प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम रविवार, ३१ मे २०२६ रोजी औंध येथील भीमसेन जोशी सभागृहात पार पडेल. या सोहळ्यात दयानंद मस्के यांनी लिहिलेल्या चार ग्रंथांचे प्रकाशन होणार आहे. यात ‘वडलांचे व गावगाड्याचे चरित्र’, ‘बाप माझा जगनाथ’, ‘कडव्यापेक्षा जनावरं स्वस्त’ आणि ‘ते दिवस आठवले काही’ या पुस्तकांचा समावेश आहे. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले उपस्थित राहणार आहेत. तसेच, आंबेडकरी शाहीर संभाजी भगत यांचीही प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. ज्येष्ठ विचारवंत व लेखक ज. वि. पवार कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील. दयानंद मसके गौरव समिती आणि मसके कुटुंबीय यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. आयोजकांनी साहित्य, कला आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांसह नागरिकांना या सोहळ्याला उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील ४० उमेदवारांवर अपात्रतेची कारवाई पुणे विभागातील नगरपरिषद, नगरपंचायती व महानगरपालिका निवडणुकांमधील पुणे महानगरपालिकेच्या २२, पंढरपूर नगरपरिषदेच्या १५ व अक्कलकोट नगरपरिषदेच्या ३ अशा एकूण ४० उमेदवारांवर २६ मे २०२६ पासून पुढील ३ वर्षासाठी अपात्र केल्याचे आदेश विभागीय आयुक्त शीतल तेली- उगले यांनी जारी केले आहेत. अपात्र घोषित करण्यात आलेल्या उमेदवारांची यादी संबंधित जिल्हाधिकारी कार्यालय तसेच संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कार्यालयात पाहण्यासाठी उपलब्ध आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार पुणे विभागातील एकूण ६० नगरपरिषदा, नगरपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक २ डिसेंबर २०२५ व ६ महानगरपालिकांची सार्वत्रिक निवडणूक १४जानेवारी २०२६ रोजी पार पडली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये निवडणूक लढविलेल्या पुणे महानगरपालिकेच्या २२, पंढरपूर नगरपरिषदेच्या १५ व अक्कलकोट नगरपरिषदेच्या ३ उमेदवारांनी अनुक्रमे महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम १० (१ई) तसेच महाराष्ट्र नगरपरिषद, नगरपंचायत व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ कलम १६ (१ड) मधील तरतुदीनुसार विहित मुदतीत (३० दिवस) निवडणूक खर्चाचा हिशोब सादर केला नाही. पुणे महानगरपालिका आयुक्त तसेच सोलापूर जिल्हाधिकारी यांनी सादर केलेल्या प्रस्तावानुसार विभागीय आयुक्त, पुणे यांच्याकडे ५ व २५मे २०२६रोजी याबाबत संबंधिताना आपले म्हणणे दाखल करण्याबद्दल सुनावणी आयोजित करण्यात आली. सदर सुनावणीदरम्यान संबंधित उमेदवारांकडून समाधानकारक खुलासा प्राप्त न झाल्याने राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार संबंधित उमेदवारांना निवडणूक खर्च सादर करण्यात कसूर केल्याबद्दल आदेशाच्या दिनांकापासून ३वर्षाच्या कालावधीसाठी निवडणूक लढविण्यास अपात्र घोषित करण्यात आले असल्याची माहिती नगर परिषद प्रशासनाच्या उप आयुक्त प्रतिभा पाटील यांनी सांगितले आहे.
Source link
ज्येष्ठ साहित्यिक दयानंद मस्के यांचा ८४वा वाढदिवस:केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते सत्कार, ग्रंथ प्रकाशन सोहळा