![]()
पाणीटंचाईच्या काळात अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अधिक सतर्क राहून जबाबदारीने काम करावे. लोकप्रतिनिधींच्या सूचनेची वाट न पाहता टंचाईग्रस्त गावांचे प्रस्ताव तातडीने सादर करा. नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटलाच पाहिजे, यात कोणतीही दिरंगाई किंवा कामात शिथिलत
.
पाथर्डी तहसील कार्यालयात शेवगाव व पाथर्डी तालुक्यांच्या टंचाई आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी प्रांत प्रसाद मते, तहसीलदार डॉ. उद्धव नाईक यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व सरपंच उपस्थित होते. जिल्हाधिकाऱ्यांनी अनधिकृत पाणी उपसा रोखण्यासाठी कठोर पवित्रा घेतला आहे. ज्या तलावांत पाणीसाठा आहे, तेथील वीजपंप जप्त करून अनधिकृत जोडण्या कापण्याचे आदेश वीज वितरण कंपनीला दिले आहेत. विशेषतः कुत्तरवाडी तलावातील अनधिकृत पाणी उपशाची गंभीर दखल घेत त्यांनी जलसंधारण विभाग आणि महावितरणला तात्काळ कारवाईचे निर्देश दिले. टँकर भरताना आणि रिकामे करतानाचे तारीख व वेळेसह फोटो सादर करावे लागणार. मी स्वतः या नोंदी तपासणार असून त्यात त्रुटी आढळल्यास गय करणार नाही. पिण्याच्या पाण्याची शुद्धता तपासण्यासाठी आरोग्य विभागाने दररोज नमुने घ्यावेत. गावातील टंचाई परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी तलाठी-ग्रामसेवकांनी मुख्यालयात थांबून सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या.
टँकर मंजुरीचे अधिकार प्रांताधिकाऱ्यांना टँकर मंजुरीसाठी विलंब होऊ नये, यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी त्याचे अधिकार प्रांताधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यामुळे प्रस्तावांत तांत्रिक दिरंगाई झाल्यास जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे.