![]()
आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघ (इस्कॉन) येवला, श्री व्रजधाम येवला आणि हरे कृष्ण भक्तवृंद विंचूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित श्री जगन्नाथ रथयात्रा महोत्सव रविवारी (दि. १९) विंचूर येथे हजारो भाविकांच्या उत्स्फूर्त सहभागात भक्तिमय वातावरणात पार पड
.
महोत्सवाची सुरुवात महाआरतीने झाली. त्यानंतर भगवान श्री जगन्नाथ, बलभद्र आणि सुभद्रा यांच्या सुशोभित रथाची भव्य मिरवणूक काढण्यात आली. हरिनाम संकीर्तन, टाळ-मृदंगाचा गजर, ‘हरे कृष्ण’ नामघोष आणि भक्तांच्या जयघोषाने संपूर्ण विंचूर नगरी भक्तिरसात न्हाऊन निघाली. रथयात्रा बजरंग गल्ली, खांडे गल्ली, नीलेश गायकवाड वेस, आंबेडकर वेस आणि तीन पाटी मार्गे राम मंदिरापर्यंत काढण्यात आली. मार्गावर विविध ठिकाणी ग्रामस्थांनी रथाचे पूजन करून भाविकांचे स्वागत केले. कार्यक्रमाच्या समारोपानंतर सर्व भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. संपूर्ण सोहळा शिस्तबद्ध, उत्साहपूर्ण आणि भक्तिमय वातावरणात यशस्वीरित्या पार पडला.
महोत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी इस्कॉन येवला, श्री व्रजधाम येवला, हरे कृष्ण भक्तवृंद विंचूर, स्वयंसेवक, ग्रामस्थ आणि भाविकांनी मोलाचे सहकार्य केले. उपस्थित भाविकांनी पुढील वर्षीही हा महोत्सव याच उत्साहात साजरा करण्याचा संकल्प व्यक्त केला.