![]()
शेतकरी संकटात असताना आम्ही हातावर हात ठेवून बसू शकत नाही. कर्ज काढून का होईना, आम्ही शेतकऱ्यांना मदत करू. शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडण्याची परंपरा उबाठा गटाची होती. आम्ही शेतकऱ्यांना साथ देतो, म्हणून देवाभाऊंचे सरकार शेतकऱ्यांचे आहे. आम्ही मेवा खात ‘मातोश्री 2’ बांधत नाही, असे भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी म्हटले आहे. नवनाथ बन म्हणाले की, ठाकरे बंधूंनी महाराष्ट्रात दुष्काळ असताना 4 तारखेला मुंबईत मोर्चा काढण्यापेक्षा, या मोर्चाच्या निमित्ताने जी करोडो रुपयांची उधळपट्टी तुम्ही करणार आहात, ती महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी जाहीर करावी. सरकार पूर्णपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. आजच शेतकऱ्यांना कर्जमाफीचा तिसरा हप्ता देण्यात आला आहे. येत्या काळात सरकार शेतकऱ्यांना मदत करेलच; पण राजकीय पक्ष म्हणून उबाठा गटाची आणि मनसेचीदेखील तेवढीच जबाबदारी आहे. राज्यातील शेतकरी संकटात असताना आम्ही मोर्चे काढण्यात व्यस्त होतो, हा इतिहास तुमच्या नावावर नोंदवला जाईल. मोर्चा काढून नौटंकी करण्यापेक्षा दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत करा. सीजेपी काँग्रेसची बी टीम नवनाथ बन म्हणाले की, अभिजीत दिपके हे स्वतः मराठवाड्यातील आहेत. मराठवाड्यातील शेतकऱ्यांची परिस्थिती पाहून त्यांनी आंदोलनाची भाषा केली पाहिजे. दिपके हे राहुल गांधी यांची ‘बी टीम’ आहेत. राहुल गांधी यांचे नेतृत्व अपयशी ठरत असल्याने त्यांना जे करता येत नाही, ते काम ते दिपकेंकडून करून घेतात. सीजेपी पक्ष काँग्रेसला पूरक भूमिका घेतो. दिपकेंनी शिवाजी पार्कवर नाही तर आझाद मैदानावर आंदोलन केले पाहिजे. राज ठाकरे हे संवेदनशील नवनाथ बन म्हणाले की, राज ठाकरे हे संवेदनशील आहेत, पण उद्धव ठाकरेंनी कधी संवेदनशीलता दाखवली नाही. राज ठाकरेंकडून आम्हाला अपेक्षा आहे की, दुष्काळाच्या काळात लाखो-करोडो रुपये खर्च करत ते मोर्चा काढणार नाहीत आणि शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहतील. जनावरांना चारा आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होणार आहे, त्यासाठी काम केले पाहिजे. निवडणूक आयोगाच्या विरोधात मोर्चा काढण्यासाठी तुम्हाला नंतरही वेळ मिळेल; पण शेतकरी संकटात असताना तुम्ही मुंबईत नौटंकी करू नका. इतिहासात तुम्ही शेतकऱ्यांसोबत नव्हता, असे लिहायचे नसेल तर मोर्चा काढू नका. तो पैसा शेतकऱ्यांसाठी द्या. तसे केले नाही, तर शेतकरी तुम्हाला मतदान करणार नाहीत आणि मग तुम्ही निवडणूक आयोगावर टीका कराल. ‘इंडिया’ आघाडीचे नेतृत्वच उरलेले नाही नवनाथ बन म्हणाले की, उबाठा आणि मनसे यांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आपले उमेदवार निवडून आणता आले नाहीत. आम्ही राज्यात आणि केंद्रात तीन वेळा निवडून आलो आहोत. ज्ञानेशकुमार हे विधानसभेच्या वेळी मुख्य निवडणूक आयुक्त नव्हते, हे राऊतांना माहिती नाही का? 2014, 2019 मध्येही ते या पदावर नव्हते. लोकांची सेवा केल्याने आम्हाला जनतेने संधी दिली आहे. आम्ही घरात बसून कारभार करत नाही, तर शेतकऱ्यांच्या बांधावर जातो, म्हणून त्यांनी आम्हाला संधी दिली आहे. उद्धव ठाकरेंचा इतिहास ‘वर्क फ्रॉम होम’चा असल्याने महाराष्ट्रातील जनतेने त्यांना घरी बसवले आहे. ‘इंडिया’ आघाडीचे नेतृत्वच उरलेले नाही. उद्धव ठाकरेंनी असेच घरी बसावे आणि त्यांनी 4 तारखेला जो मोर्चा काढायचे ठरवले आहे, तोसुद्धा ऑनलाईन काढावा. त्यातून वाचणारे पैसे शेतकऱ्यांना द्यावेत. ‘मातोश्री’वर बसून सोशल मीडियावर लाईव्ह करत मोर्चा काढा, असा टोलाही बन यांनी ठाकरेंना लगावला आहे. हे ही वृत्त वाचा नरेंद्र मोदी, अमित शहा-देवेंद्र फडणवीस लोकशाहीचा गळा आवळत आहेत:पूर्णेकर यांच्या हत्तेमागील सूत्रधारांना अटक करा- संजय राऊत
पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस हे लोकशाहीचा गळा आवळण्याचे काम करत आहेत. त्यांना आमचा आवाज कायमचा बंद करून शांतता हवी आहे का? असा सवाल खासदार संजय राऊत यांनी केला आहे. तसेच, जे लोक काल शिवाजी पार्कवर आले होते, त्यांना त्या पार्कचा इतिहास माहिती नाही, असेही ते म्हणाले. वाचा सविस्तर
Source link