![]()
इंडियन सोसायटी ऑफ डिजिटल डेन्टिस्ट्रीतर्फे 19 ते 21 नोव्हेंबर 2026 दरम्यान पुण्यात ‘अत्याधुनिक दंतचिकित्सा व दंतरोपण’ या विषयावर तिसरी आंतरराष्ट्रीय परिषद होणार आहे. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते 20 नोव्हेंबरला परिषदेचे उद्घाटन होईल. डिजिटल दंतचिकित्सेचा प्रसार करणे आणि अत्याधुनिक उपकरणे बनवणाऱ्या कंपन्या व दंतवैद्यांना एकत्र आणणे हा परिषदेचा उद्देश आहे, अशी माहिती इंडियन सोसायटी ऑफ डिजिटल डेन्टिस्ट्रीचे अध्यक्ष डॉ. रत्नदीप जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी संस्थेचे सचिव डॉ. विजय ताम्हाणे आणि संचालक व खजिनदार डॉ. कौस्तुभ पाटील उपस्थित होते. परिषदेत अत्याधुनिक यंत्रे, प्रगत संगणक प्रणाली, थ्रीडी प्रिंटिंग, स्कॅनिंग आणि रोबोटिक तंत्रज्ञानासह दंतोपचार व दंतरोपणातील नव्या पद्धतींवर चर्चा होईल, असे डॉ. जाधव यांनी सांगितले. या तंत्रज्ञानाची माहिती अधिकाधिक दंतवैद्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आहे. बालेवाडीतील हॉटेल ऑर्किड येथे होणाऱ्या परिषदेत देश-विदेशातील 600 ते 700 दंतवैद्य सहभागी होतील. मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड अॅग्रीकल्चरचे महासंचालक प्रशांत गिरबाने प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. डॉ. विजयकुमार ताम्हाणे यांनी सांगितले की, तिन्ही दिवस चर्चासत्रे आणि प्रात्यक्षिक कार्यशाळा होतील. दंतरोपणाचे प्रकार व मूलभूत तत्त्वे, तात्पुरते उपचार, कायमस्वरूपी उपचार आणि त्यासाठी लागणारी उपकरणे यांवर तज्ज्ञ मार्गदर्शन करतील. दैनंदिन दवाखान्यात दंतवैद्यांना येणाऱ्या समस्यांवरही चर्चा होईल. तंत्रज्ञानामुळे उपचार सोपे होतात आणि उपचारांदरम्यान मानवी चुका कमी करण्यास मदत होते. कमी खर्चात चांगले उपचार घेणेही शक्य होते, असे डॉ. ताम्हाणे म्हणाले.
Source link
डिजिटल दंतचिकित्सेवरील आंतरराष्ट्रीय परिषद 19 नोव्हेंबरपासून:पुण्यात तीन दिवस चालणाऱ्या परिषदेत 600 ते 700 दंतवैद्य सहभागी होतील; चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उद्घाटन