Headlines

डीजेचा आवाज 75 डेसिबलच्या आत ठेवा:लासलगाव डॉक्टर्स असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांचे पोलिसांना निवेदन‎




सण-उत्सव व मिरवणुकांमध्ये होणाऱ्या कानठळ्या बसवणाऱ्या आवाजामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत असल्याकडे लक्ष वेधत, लासलगाव डॉक्टर्स असोसिएशनतर्फे सहाय्यक पोलिस निरीक्षक सागर कोते यांना निवेदन सादर करण्यात आले. उत्सवांमध्ये डीजे व ध्वनिवर्धकांचा आवाज ७५ डेसिबलच्या खाली ठेवण्यात यावा, अशी प्रमुख मागणी असोसिएशनने केली असून, ध्वनीप्रदूषणासंदर्भा तील नियमांची वर्षभरातील सर्व मिरवणुका व सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये काटेकोर व समान अंमलबजावणी करावी, असे निवेदनात नमूद केले आहे. मोठ्या आवाजाच्या सतत किंवा वारंवार संपर्कात आल्यामुळे कानात सतत आवाज येणे, ऐकण्याच्या क्षमतेवर परिणाम होणे, डोकेदुखी, झोपेचा त्रास, चिडचिड, मानसिक तणाव आणि अस्वस्थता यांसारखे गंभीर विकार उद्भवू शकतात. काही व्यक्तींमध्ये अपुरी झोप व तणावामुळे उच्च रक्तदाब किंवा हृदयाशी संबंधित आजार वाढण्याचा मोठा धोका असतो. विशेषतः लहान बालके, ज्येष्ठ नागरिक, गरोदर महिला, हृदयविकार किंवा उच्च रक्तदाबाचे रुग्ण आणि ध्वनीसाठी संवेदनशील व्यक्तींना या मोठ्या आवाजाचा प्रचंड त्रास सहन करावा असे निवेदनात नमूद आहे.डॉ. स्वप्निल जैन, डॉ. सुरेश दरेकर, डॉ. विलास कांगणे, डॉ. अनिल बोराडे, डॉ. श्रीकांत आवारे, डॉ. संगीता सुर्सेयांच्यासह लासलगाव डॉक्टर्स असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *