Headlines

जिल्ह्यात 45 दिवसांपासून पावसाची दडी; त्वरित दुष्काळ जाहीर करावा:लासलगावात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचा एकमुखी ठराव‎


.

गेल्या पन्नास दिवसांपासून पावसाचा मोठा खंड पडल्याने तालुक्यातील खरीप पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून, बागलाण तालुक्याचा तत्काळ दुष्काळग्रस्त यादीत समावेश करावा, अशी मागणी शेतकऱ्यांच्या वतीने बागलाण तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. सोमवारी (दि. २१) भाजप किसान मोर्चा प्रदेश महामंत्री बिंदू शर्मा यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी तहसीलदारांना निवेदन दिले.

तालुक्यात यंदा पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने जमिनीतील ओलावा घटला आहे. मका, बाजरी, कांदा यासह विविध पिकांचे नुकसान झाले असून फळबागांवरही त्याचा मोठा परिणाम झाला आहे. आगामी काळात पिण्याचे पाणी तसेच जनावरांच्या चारा-पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली. पर्जन्यमान, पीक नुकसान, पाण्याची उपलब्धता व दुष्काळी निकषांची प्रत्यक्ष पाहणी करून वस्तुनिष्ठ अहवाल शासनाकडे पाठवावा. सर्व गावांत सरसकट पीक पंचनामे करून नुकसानग्रस्तांना आर्थिक मदत व दुष्काळी सवलतींचा लाभ द्यावा. पिण्याचे पाणी व जनावरांसाठी चारा-पाण्याची तातडीने व्यवस्था करून बागलाणचा दुष्काळात समावेश करावा, अशी मागणी करण्यात आली. दुष्काळामुळे आधीच आर्थिक संकटात सापडलेला बळीराजा आता कर्जबाजारीपणाच्या उंबरठ्यावर येऊन ठेपला आहे. त्यामुळे शासनाने प्रत्यक्ष मदत देण्याची कार्यवाही तातडीने करावी, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे. यावेळी सुधाकर पाटील, रविंद्र सोनवणे, काशिनाथ हांडे, प्रविण वाघ, राजेंद्र बच्छाव आदींसह बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते.

प्रतिनिधी | लासलगाव जिल्ह्यात सुमारे ४५ दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने खरीप पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून, संपूर्ण जिल्हा तातडीने दुष्काळग्रस्त जाहीर करावा, असा एकमुखी ठराव लासलगाव येथे पार पडलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या जिल्हा बैठकीत संमत करण्यात आला. या संदर्भात येत्या २४ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकाऱ्यांना प्रत्यक्ष निवेदन सादर करण्याचा निर्णय संघटनेतर्फे घेण्यात आला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेची नाशिक जिल्हा बैठक प्रदेशाध्यक्ष घनश्याम चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत संघटनेची पुनर्बांधणी करणे आणि ‘गाव तिथे शाखा’ हा उपक्रम प्रभावीपणे राबविण्याबाबत सविस्तर चर्चा झाली; तालुक्यातील सर्व पदाधिकाऱ्यांनी या उपक्रमास एकमुखाने मान्यता दिली. तसेच येत्या १० ऑक्टोबर रोजी जयसिंगपूर येथे होणाऱ्या ऊस परिषदेस शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कांच्या लढ्यासाठी जिल्ह्यातील सर्व पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचा निर्णयही या वेळी घेण्यात आला. बैठकीच्या प्रास्ताविकात जिल्हाध्यक्ष निवृत्ती घारे पाटील यांनी दुष्काळामुळे शेतकरी वर्गाचे होणारे हाल मांडत वस्तुस्थितीवर लक्ष वेधले. बैठकीस संघटनेचे राज्य समन्वयक कुबेर जाधव, उत्तर महाराष्ट्र सरचिटणीस प्रभाकर बेंडकुळे, महिला आघाडीच्या अध्यक्षा अनिता कोल्हे, उपाध्यक्ष सुनंदा दाते, रवींद्र शेवाळे, सरचिटणीस मच्छिंद्र जाधव, सिन्नर तालुकाध्यक्ष आत्माराम पगार, निफाड तालुकाध्यक्ष गजानन घोटेकर, दिंडोरी तालुकाध्यक्ष सोमनाथ कावळे, मालेगाव तालुकाध्यक्ष संजय जाधव आणि सिन्नर महिला आघाडी अध्यक्षा मनीषा पगार आदी उपस्थित होते. या वेळी लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने वाढवणे यांच्या हस्ते, तर व्यापारी असोसिएशनच्या वतीने प्रवीण कदम यांच्या हस्ते प्रदेशाध्यक्ष घनश्याम चौधरी यांचा सत्कार करण्यात आला. येवला तालुकाध्यक्ष विलास दरगुडे यांनी उपस्थितांचे आभार मानले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *