Headlines

वाहनावर दंडात्मक कारवाई केल्याने पोलिस कर्मचाऱ्यास बेदम मारहाण:चौघांवर हिंगोली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल




हिंगोली शहरामध्ये वाहनावर दंडात्मक कारवाई का केली या कारणावरून शहर वाहतूक शाखेच्या पोलिस कर्मचाऱ्यास बेदम मारहाण झाल्याची घटना मंगळवारी ता. २२ दुपारी घडली आहे. या प्रकरणी चौघांवर हिंगोली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंगोली शहरात वाहतुक व्यवस्थेला वळण लावण्यासाठी पोलिस विभागाकडून प्रयत्न केले जात आहेत. यासाठी शहरातील सार्वजनिक चौकांमधून पोलिस कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. या कर्मचाऱ्यांकडून वाहनांची तपासणी केली जात असून वाहन चालकांकडे असलेल्या वाहतुकीचा परवाना, वाहनाच्या कागदपत्रांची तपासणी देखील केली जात आहे. परवाना नसतांनाही वाहन चालविणाऱ्या वाहन चालकांवर कारवाई केली जात आहे. दरम्यान, शहर वाहतुक शाखेचे कर्मचारी कपील जाधव हे आज दुपारच्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौक येथे कर्तव्यावर होते. यावेळी त्यांनी एका वाहन चालकावर वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्या प्रकरणी दंडात्मक कारवाई केली. या कारवाईचा राग आल्याने वाहन चालक प्रमोद मांडगे (रा. पेडगाववाडी, ता. हिंगोली) याने माझ्या वाहनावर दंडात्मक कारवाई का केली या कारणावरून वाद घालण्यास सुरवात केली. यावेळी सतीष पडोळे, शाम साबळे, शिवशंकर दराडे हे देखील तेथे आले. यावेळी प्रमोद याने पोलिस कर्मचारी कपील यांना लोखंडी रॉडने डोळ्यावर, पोटावर, छातीवर मारहाण करून गंभीर जखमी केले तर उर्वरीत तिघांनी शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी पोलिस कर्मचारी कपील यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी वरील चौघांवर शासकिय कामात अडथळा आणल्याच्या आरोपावरून गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक देवेंद्रसिंग ठाकूर, उपनिरीक्षक युवराज वाघमारे, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक संजय मार्के, जमादार अशोक धामणे यांच्या पथकाने त्यांना ताब्यात घेतले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *