Headlines

डॉ. बिपुल कुमार राय यांना यावर्षीचा पं.भीमसेन जोशी पुरस्कार जाहीर:प्रख्यात संतूरवादक पं. भजन सोपोरी यांचे ते ज्येष्ठ शिष्य




गुरुकुल कलाश्री संगीत मंडळ आणि द औंध सोशल फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी देण्यात येणारा भारतरत्न पं. भीमसेन जोशी पुरस्कार यावर्षी नामवंत संतूर वादक डॉ. बिपुल कुमार राय यांना जाहीर झाला असल्याची माहिती द औंध सोशल फाऊंडेशनचे अध्यक्ष अभिजित गायकवाड यांनी कळविली आहे. रोख रुपये ११ हजार, मानचिन्ह, शाल, श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप असेल. येत्या काही दिवसात संपन्न होणाऱ्या १३ व्या भारतरत्न पं. भीमसेन जोशी संगीत महोत्सवात सदर पुरस्कार डॉ. राय यांना प्रदान करण्यात येईल. प्रख्यात संतूर वादक पद्मश्री पं. भजन सोपोरी यांचे ज्येष्ठ शिष्य असलेले डॉ. बिपुल कुमार राय हे आंतरराष्ट्रीय स्तरावर नामांकित संतूर वादक, संगीतकार, शिक्षक आहेत. वाद्यावरील तांत्रिक प्रावीण्य आणि नाविन्यपूर्ण संगीत दृष्टिकोनासाठी ते विशेष प्रसिद्ध असून आपल्या वादनामधून ते परंपरा आणि समकालीन अभिव्यक्तीचा सुंदर मेळ साधतात. त्यांनी संतूर या विषयात दिल्ली विद्यापीठातून पीएच.डी. तसेच शास्त्रीय गायनात एम.फिल. आणि पदव्युत्तर (मास्टर्स) पदवी प्राप्त केली आहे. ते आकाशवाणी आणि दूरदर्शनचे ‘टॉप ग्रेड’ कलाकार तसेच सांस्कृतिक मंत्रालयाच्या ‘आऊटस्टँडिंग कॅटगॅरी’मध्ये सूचीबद्ध कलाकार आहेत. भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेचे सुद्धा ते सूचीबद्ध कलाकार आहेत. ‘रागांजली अकादमी ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स’ या संस्थेचे ते संस्थापक असून शिक्षण, कार्यशाळा आणि आंतर-सांस्कृतिक सहकार्याच्या माध्यमातून ते तरुण प्रतिभावंतांना प्रोत्साहन व प्रशिक्षण देण्यामध्ये सक्रिय योगदान देत आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *