Headlines

Sharad Pawar Merger Statement; Sunil Tatkare Reacts


‘आम्ही कोणासोबत जाणार नाही. यायचे असेल तर आमच्यात या,’ असे सांगत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाच्या सर्व चर्चा फेटाळून लावल्यात. तसेच आपली वाटचाल पुन्हा तेवढ्याच तडफेने सुरू राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. आता य

.

पत्रकारांशी बोलताना सुनील तटकरे म्हणाले, अजित दादांच्या नेतृत्वात जेव्हा आम्ही एनडीएमध्ये जाण्याचा निर्णय सामूहिकरित्या घेतला. स्वर्गीय चव्हाण साहेबांचे विचार, बहुजनांचे हित साधायचे असेल तर सत्तेमध्ये असले पाहिजे, या विचारांवर पुढे जात आम्ही मोदी साहेबांच्या नेतृत्वात एनडीएमध्ये प्रवेश केला. दादांच्या दुर्दैवी अकाली निधनानंतर सुनेत्रा वहिनी आज राष्ट्रीय अध्यक्ष आहेत आणि उपमुख्यमंत्री म्हणून काम करत आहेत. आदरणीय पवार साहेब हे देशाचे नेते आहेत. त्यामुळे त्यांनी जे काही मत व्यक्त केले आहे, त्यावर मी काही बोलणार नाही.

पवार साहेबांचे टायमिंग हे त्यांनाच माहीत असते

पुढे बोलताना सुनील तटकरे म्हणाले, पवार साहेबांचे टायमिंग हे त्यांनाच माहीत असते. ते राज्याच्या राजकारणात मग ती कधी व्यक्त होत असतानाच राजकारणात 80, 90 च्या दशकात त्यांनी त्यांच्या पद्धतीने टायमिंग साधलेले आहे. त्यामुळे आता त्याच्या पाठीमागचे नेमके काय कारण आहे हे त्यांनाच माहीत आहे.

आम्ही एनडीएमध्ये दादांच्या नेतृत्वात गेलो

शशिकांत शिंदे यांनी देखील म्हटले की विलीनीकरण झालेच तर राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटातच यावे, असे म्हटले होते. यावर सुनील तटकरे म्हणाले, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने अजित दादांच्या नेतृत्वात जो काही निर्णय घेतला आणि अभूतपूर्व असे यश विधानसभा निवडणुकीत मिळाले. नगरपालिका, जिल्हा परिषद, महापालिका यात देखील दादांच्या नेतृत्वात यश मिळाले आहे. त्यामुळे आम्ही एनडीएमध्ये दादांच्या नेतृत्वात गेलो, मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाची प्रगती होत आहे.

सुप्रिया सुळेंच्या विधानावर काय म्हणाले तटकरे?

दरम्यान, सुप्रिया सुळे यांनी असे म्हटले होते की आम्ही लढण्याच्या तयारीत आहोत, याचा अर्थ कसा घ्यायचा? यावर उत्तर देताना सुनील तटकरे म्हणाले, त्याचा कॉन्टेक्स्ट काय आहे, त्याचा संदर्भ काय आहे हे मला माहीत नाही. लढणे म्हणजे राजकीय पक्षासाठी होत नाही, लोकांसाठी लढणे असा देखील अर्थ होऊ शकतो. आम्ही सुनेत्रा पवारांच्या नेतृत्वाखाली योग्य पद्धतीने काम करत आहोत, असे तटकरे यांनी म्हटले आहे.

ज्येष्ठ नेते शरद पवारांनी दुष्काळाच्या संदर्भात काढण्यात आलेल्या जीआरबद्दल नाराजी व्यक्त केली होती. यावर सुनील तटकरे यांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले, महाराष्ट्रातले महायुतीचे सरकार जे देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली काम करत आहे. एकनाथ शिंदे आहेत, सुनेत्रा वहिनी आहेत, आम्ही सर्व शेतकऱ्यांच्या प्रती संवेदनशील आहोत, अशी प्रतिक्रिया तटकरे यांनी दिली आहे.

या संदर्भातील ही देखील बातमी वाचा…

यायचं असेल तर आमच्यासोबत या:शरद पवार म्हणाले- आम्ही कोणासोबत जाणार नाही; राष्ट्रवादी काँग्रेसचे विलीनीकरण पुन्हा चर्चेत

‘आम्ही कोणासोबत जाणार नाही. यायचं असेल तर आमच्यासोबत या,’ असा खणखणीत संदेश देत शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाच्या सर्व चर्चा फेटाळून लावल्यात. तसेच आपली वाटचाल पुन्हा तेवढ्याच तडफेने सुरू राहील, असा संदेश त्यांनी कार्यकर्त्यांना दिला. आगामी काळात निवडणुकांचे निकाल फिरवण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वापर होऊ शकतो, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली. वाचा सविस्तर



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Newsmatic - News WordPress Theme 2026. Powered By BlazeThemes.