![]()
येथील १३ वर्षीय शाळकरी विद्यार्थिनीचा तीव्र तापामुळे संभाजीनगर येथील शासकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी घडली. बुशरा मोसीन बागवान (१३) असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे. पाचोडच्या इस्लामपुरा येथील खासगी वाहनचालक मोसीन हमीद बागवान यांची मुलगी बुशरा ही पाचोड येथील शिवछत्रपती विद्यालयात आठवीत शिकत होती. बुशराला चार ते पाच दिवसांपासून अचानक तीव्र ताप येत होता. कुटुंबीयांनी प्रथमतः तिच्यावर पाचोड येथील खासगी दवाखान्यात उपचार घेतले. परंतु, औषधोपचारानंतरही ताप उतरत नसल्याने तिला छत्रपती संभाजीनगर येथील खासगी रुग्णालयात आणि त्यानंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, उपचार सुरू असतानाच तिची प्राणज्योत मालवली. मंगळवारी रात्री आठ वाजता तिचा दफनविधी करण्यात आला. या घटनेमुळे पाचोड परिसरातील वाढत्या आजारांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. विद्यार्थ्यांची वैद्यकीय तपासणी करावी, अशी मागणी पालकांतून हो त आहे. मृत बुशराच्या पश्चात आई, वडील, दोन बहिणी, भाऊ असा परिवार आहे. पहिल्या सत्राची परीक्षा देण्याचे स्वप्न अपूर्णच अत्यंत हुशार आणि मनमिळाऊ स्वभावाची असलेली बुशरा पाचोड येथील शिवछत्रपती विद्यालयात इयत्ता आठवीत शिकत होती. ती सध्या पहिल्या सत्राच्या सहामाही परीक्षेची तयारी करत होती. मात्र, तापामुळे तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मृत्यूमुळे तिचे परीक्षेला बसण्याचे स्वप्न अपूर्ण राहिले असून अचानक जाण्याने वर्गातील मैत्रिणींना धक्का बसल ा.
Source link
तीव्र तापामुळे पाचोडला 13 वर्षीय मुलीचा मृत्यू घाटीत उपचार सुरू असताना प्राणज्योत मालवली